आमदारकी टिकविण्याचा ठेका शेतकऱ्यांनी घेतला नाही; काँग्रेसचा NCP आमदारावर घणाघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress-NCP

काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढा उभारणार आहे.

आमदारकी टिकविण्याचा ठेका शेतकऱ्यांनी घेतला नाही

सातारा : किसन वीर कारखान्याकडे (Kisan Veer Sugar Factory) थकीत असलेली यावर्षीची ऊसबिले येत्या २९ तारखेपर्यंत सभासदांच्या खात्यावर कारखाना व्यवस्थापनाने जमा करावीत, अन्यथा ३० ऑगस्टला काँग्रेस पक्षाच्या वतीने किसन वीर आबांच्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्यासमोर कारखाना व्यवस्थापनाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे (Congress District President Viraj Shinde) यांनी दिली. दरम्यान, वाई तालुक्यातील (Wai taluka) लोकप्रतिनिधींचे आमदारकी व कारखान्यासाठी असलेले साटेलोटे आता बंद झाले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत विराज शिंदे यांनी किसन वीर कारखान्याच्या सभासदांसाठी काँग्रेस (Congress) रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘किसन वीर साखर कारखान्याकडे असलेली यावर्षीची प्रलंबित ऊसबिले येत्या २९ तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावीत, तसेच कामगारांची थकीत देणीही द्यावीत. अन्यथा ३० ऑगस्टला किसन वीर आबांच्या जयंती दिनी त्यांच्या कारखान्यावरील पुतळ्यासमोर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव सहभागी होणार आहेत.’’

हेही वाचा: मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचा 'टाईमपास' बंद करा

आमदार मकरंद पाटलांवर (MLA Makarand Patil) टीका करताना श्री. शिंदे म्हणाले, ‘‘किसन वीर कारखान्याच्या सभासदांच्या हितासाठी विद्यमान आमदारांनी कधीच लढा उभारला नाही. केवळ आपली आमदारकी टिकविण्यासाठी सभासदांचे प्रश्न उपस्थित न करता कारखान्याच्या नादी लागायचे नाही, हेच आजपर्यंत पाहायला मिळाले. हे आता सभासद व शेतकरी खपवून घेणार नाहीत. त्यांची आमदारकी टिकविण्याचा ठेका शेतकरी व सभासदांनी घेतलेला नाही. आमदारकी व कारखान्यावरून वाई तालुक्यातील दोन लोकप्रतिनिधींत असलेले साटेलोटे बंद झाले पाहिजे. यापुढे काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढा उभारणार आहे.’’ या वेळी काँग्रेसचे वाई तालुकाध्यक्ष रवींद्र भिलारे, कार्याध्यक्ष सुनील बाबर, उपाध्यक्ष कल्याणराव पिसाळ, आनंद जाधव, सागर गायकवाड, अमोल शिंदे, सूरज कीर्तिकर, रिजवान शेख, गणेश रोकडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: शेतकऱ्यांवरील भाजपचे पुतना मावशीचे प्रेम; काँग्रेस नेत्याची परखड टीका

टोलमाफी द्यावी

टोलनाक्याच्या प्रश्नाबाबत विचारले असता ते म्हणाले, वाई तालुका व सातारा तालुक्याच्या हद्दीवर असलेला टोलनाका बंद झाला पाहिजे. सातारा जिल्ह्यातील वाहनांसाठी टोलमाफी दिली गेली पाहिजे. त्यासाठी होणाऱ्या सर्वपक्षीय आंदोलनास आमचा पाठिंबा राहील.

Web Title: Congress District President Viraj Shinde Criticizes Mla Makarand Patil

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kisan Veer Sugar Factory