काळजी करुन नका! तुमच्यावर कारवाई हाेणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा व्यावसायिकांना दिलासा

राजेंद्र ननावरे
Wednesday, 28 October 2020

त्यावेळेस महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर असलेल्या दुकानदारांनी, व्यावसायिकांनी आपली जुनी बांधकामे महामार्ग प्राधिकरणाच्या नियमन रेषेनुसार कायम केली होती.

मलकापूर (जि. सातारा)  : मालमताधारकांची योग्य ती तपासणी, शहानिशा व पडताळणी करून म्हणणे ऐकून घेऊन व सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्याशिवाय कोणतीही कारवाई करू नये. पालिकेने केलेली अन्यायकारक अतिक्रमण मोहीम रद्द करावी, अशी मागणी महामार्गालगतच्या व्यावसायिकांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन देऊन केली. दरम्यान, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन काशीद यांनीही पालिकेला पत्र देऊन कारवाई करू नये, अशी मागणी केली आहे.
 
काशीद म्हणाले, की महामार्गालगत असलेल्या मालमत्ताधारकांच्या बांधकामाबाबत नोटीस बजावल्या असून, हे बांधकाम 48 तासांत काढून घेण्याबाबत आदेश दिले आहेत; परंतु 2001 ते 2003 मध्ये महामार्गाचे सहापदरीकरण करण्यात आले. या वेळी मलकापूर हद्दीत सर्व मालमत्ताधारक व अन्याय निवारण कृती समितीच्या मागणीनुसार 48 ते 45 मीटर अशी रस्त्याची रुंदी ठरवण्यात आली.

दाेन जीवलग मैत्रिणी खेळत हाेत्या भातुकलीचा खेळ; तेवढ्यात गांधील माशांनी केला जीवघेणा हल्ला आणि सर्व संपलं

त्या वेळी महामार्गाच्या सर्व्हिस रोडलगत असलेली दुकाने व्यवसाय प्रतिष्ठाने यांना नियमन रेषा आखून देण्यात आली. त्यानुसार त्यावेळेस महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर असलेल्या दुकानदारांनी, व्यावसायिकांनी आपली जुनी बांधकामे महामार्ग प्राधिकरणाच्या नियमन रेषेनुसार कायम केली होती. या बांधकामास त्यावेळेच्या ग्रामपंचायतीने नोंदी करून मान्यताही दिली होती. त्यानुसार असलेल्या बांधकामाला आपण बजावलेली नोटीस अन्यायकारक आहे. या वेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यावसायिकांची म्हणणे ऐकून ज्यांनी कायदेशीररीत्या बांधकाम केले आहे. अशा व्यावसायिकांना नागरिकांना दिलासा द्यावा, असे सांगितले आहे.

मलकापूर अतिक्रमण मोहिमेस स्थगिती : अशोकराव थोरात

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Leader Prithviraj Chavan Assures Malkapur Traders Satara News