परतीच्या पावसाचा फटका; कऱ्हाडच्या शेतकऱ्यांसाठी दोन कोटी : पृथ्वीराज चव्हाण

हेमंत पवार
Thursday, 29 October 2020

दिवाळीत अनेक जण गावी येतील. त्यामध्ये पुन्हा निर्बंध फेकून देऊन कार्यवाही केली, तर पुन्हा धोका आहे. त्यामुळे आवश्‍यक ती काळजी घेतली पाहिजे. अजूनही मुंबई गजबजलेली दिसत असली, तरी अर्थव्यवस्था पूर्ववत झालेली नाही असे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले.

कऱ्हाड ः तालुक्‍यात एक हजार 48 हेक्‍टरवरील पिके बाधित झाली आहेत. पाच हजार 852 शेतकऱ्यांचा पंचनामा झाला आहे. जुन्या निर्णयाप्रमाणे एक कोटी 17 लाखांची भरपाई शेतकऱ्यांना मिळेल. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या नव्या आदेशाप्रमाणे सुमारे दोन कोटी रुपये भरपाई मिळेल, अशी माहिती आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे दिली.
 
अतिवृष्टीने झालेले नुकसान आणि कोविडसंदर्भातील आढावा बैठक नुकतीच आमदार चव्हाण यांनी घेतली. त्यानंतर ते बोलत होते. प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, कॉंग्रेसचे कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, शिवराज मोरे, निवास थोरात, शंकराव खबाले, राजेंद्र चव्हाण, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आमदार चव्हाण म्हणाले, ""मागील वर्षी आलेल्या महापुरातील नुकसानीपोटी 19 कोटी 14 लाखांची भरपाई देण्यात आली आहे.

महाविकासने आमच्या हिताचा निर्णय घ्यावा; शेतक-यांचे पृथ्वीराज चव्हाणांना साकडे

जुलै-ऑगस्टची अतिवृष्टी आणि ऑगस्ट महिन्याचा अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी एक कोटी 28 लाखांची भरपाई दिली आहे. जमीन खरडून गेलेल्याची भरपाई लवकरच मिळेल. काही ठिकाणी पंचनाम्यांत त्रुटी आहेत. त्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. सुदैवाने पावसात जीवीतहानी झालेली नाही. निसर्ग वादळात काही गावांतील घरांचे पत्रे उडाले आहेत. त्यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा केली जाईल. रस्त्यांचे नुकसान झाले आहे, त्याचेही पंचानामे केलेले आहेत.''

पदवीधर निवडणूक : अनिल सोले की संदीप जोशी?, भाजपात एकच चर्चा
 
ते म्हणाले, ""तालुक्‍यात कोरोना बाधितांची संख्या नऊ हजार 105 होती. त्यातील 313 जणांचा मृत्यू झाला, आठ हजार 308 जण बरे झाले. सध्या 484 जणांवर उपचार सुरू आहेत. सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात परिस्थिती गंभीर होती. बेड मिळत नव्हते. ऑक्‍सिजन बेड मिळाले नाहीत, म्हणून काही जणांचे प्राण गेले. कोरोनाची लढाई अजूनही संपलेली नाही. अमेरिका, जर्मनमध्ये दुसरी व तिसरी लाट आली आहे. दुसरी लाट येणार नाही, असे खात्रीशीर कोणी सांगू शकत नाही. हा व्हायरस स्वतःला बदलत आहे. त्यामुळे जुने उपाय बदललेल्या व्हायरसवर चालेल असे नाही.

तोंडे बघून मलकापूरात अतिक्रमणची कारवाई कशासाठी? अशोकराव थोरात

दिवाळीत अनेक जण गावी येतील. त्यामध्ये पुन्हा निर्बंध फेकून देऊन कार्यवाही केली, तर पुन्हा धोका आहे. त्यामुळे आवश्‍यक ती काळजी घेतली पाहिजे. अजूनही मुंबई गजबजलेली दिसत असली, तरी अर्थव्यवस्था पूर्ववत झालेली नाही.''

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Leader Prithviraj Chavan Held Meeting In Karad Satara News