
त्यांनी रयत सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंक त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होती. ही बॅंक राज्यातील अग्रगण्य बॅंक म्हणून ओळखली जाते.
सातारा : सातारा जिल्ह्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील- उंडाळकर यांचे आज (साेमवार) येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. काही दिवसांपासून ते आजारी हाेते. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात माेठी पाेकळी निर्माण झाली आहे.
पाटील हे कॉंग्रेसचे माजी आमदार, माजी मंत्री राहिले आहेत. कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातून अनेक वर्षे त्यांनी प्रतिनिधीत्व केले. त्यांचे उंडाळे हे मूळगाव. ते काका नावाने सुपरिचित हाेते. त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. विलासराव पाटील यांनी 1962 मध्ये राजकारणात प्रवेश केला. ते उंडाळे गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले. 1967 मध्ये दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य झाले. 1980 ते कऱ्हाड दक्षिणमधून आमदार झाले. 2014 पर्यंत ते आमदार होते.
याच कालावधीत त्यांनी रयत सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. सात वर्षापुर्वीपर्यंत सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंक त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होती. ही बॅंक राज्यातील अग्रगण्य बॅंक म्हणून ओळखली जाते.