केंद्र सरकारविरोधात काँग्रेसची हल्लाबोल रॅली; कऱ्हाडात 18 एप्रिलला ओबीसींचा महामेळावा I Congress | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress

'अखेरच्या टप्प्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मेळाव्यास उपस्थित राहून ओबीसी समाजास मार्गदर्शन करणार आहेत.'

Congress : केंद्र सरकारविरोधात काँग्रेसची हल्लाबोल रॅली

सातारा : जिल्हा काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस (Congress) कमिटी ओबीसी विभाग यांच्या वतीने येत्या १८ एप्रिलला केंद्र सरकारच्या विरोधात हल्लाबोल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी (Bhanudas Mali) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान, कऱ्हाडला मान्यवरांच्या उपस्थितीत ओबीसींचा महामेळावा होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

श्री. माळी म्हणाले,‘‘ महात्मा फुले यांची जयंती आम्ही राज्यभर अतिशय उत्साहात साजरी केली. महाराष्ट्रात ओबीसी काँग्रेसच्या (OBC Congress) वतीने सर्व जिल्ह्यांत जयंती साजरी झाली. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीतही महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. येत्या १८ एप्रिलला केंद्र सरकारच्याविरोधात सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग यांच्या वतीने ‘हल्लाबोल रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा: पाकिस्तानबाबत मेहबूबा मुफ्तींचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या, भारतासारखी तिथं..

या रॅलीनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या अध्यक्षतेखाली कऱ्हाड टाऊन हॉलमध्ये ओबीसींचा भव्य मेळावा होणार आहे. या मेळाव्याचे उद्‌घाटन मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ओबीसी विभागाच्या वतीने हा सर्वांत मोठा मेळावा होणार आहे. अखेरच्या टप्प्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मेळाव्यास उपस्थित राहून ओबीसी समाजास मार्गदर्शन करणार आहेत.’’

Web Title: Congress Rally Against Central Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top