esakal | कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यसंस्कारास कोणतेही शुल्क नको; कॉंग्रेसची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Congress

कोरोना बाधितांसह कुटुंबीयांची आर्थिक अडचण असतानाच बाधितांचा मृत्यू झाला, की नातेवाइकांना हॉस्पिटलचे बिल भरताना कसरत करावी लागते.

कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यसंस्कारास कोणतेही शुल्क नको

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : कोरोना बाधितांचे (Coronavirus) कुटुंबीय मानसिकदृष्ट्या ढासळलेले असतात. त्या स्थितीत येथील पालिका शहराबाहेरील मृतांच्या अंत्यसंस्कारसाठी शुल्क आकारते आहे, तसे कोणतेही शुल्क आकारू नये, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे (Congress Vice-president Shivraj More) यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके (Ramakant Dake) यांच्याकडे केली. त्याबाबतचे निवेदन कॉंग्रेसतर्फे देण्यात आले. (Congress Vice-president Shivraj More Demand Not To Take Money From Corona Patient)

कोरोना बाधितांसह कुटुंबीयांची आर्थिक अडचण असतानाच बाधितांचा मृत्यू झाला, की नातेवाइकांना हॉस्पिटलचे बिल भरताना कसरत करावी लागते. त्यातच मृत कोरोना रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांना पैसे मोजावे लागतात. याबाबत मोरे म्हणाले, "बाधितांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचलेले असतात. अशा स्थितीत मृत बाधितावर अंत्यसंस्कारसाठी पालिकेला पैसे भरावे लागतात. पालिकेने अंत्यसंस्कारासाठी कोणतेही शुल्क आकारू नये. मलकापूर, सातारा पालिका अंत्यसंस्कारसाठी कोणतेही शुल्क आकारत नाही. त्यामुळे कऱ्हाड पालिकेनेही बाहेरील कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कारासाठी शुल्क आकारू नये.''

राज्याच्या आराेग्य विभागापुढे उभे ठाकणार नवे संकट?

Congress Vice-president Shivraj More Demand Not To Take Money From Corona Patient