

Congress Keeps Options Open After Key Meeting at District Office
Sakal
सातारा : भाजपचे धोरण शेतकरी, शेतमजूर, कामगार व वंचितांच्या विरोधी आहे. भाजपद्वारे हा सगळा समाज मातीमोल करण्याचे काम सुरू असताना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत त्यांचा पराभव करणे हे काँग्रेसचे प्रथम लक्ष असेल. त्यामुळे काँग्रेसला गृहीत धरून कोणी भूमिका घेणार असेल, तर काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेईल, असा निर्णय काँग्रेसच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिली.