
कऱ्हाड : येथील शनिवार पेठेतील अशोक चौक परिसरात सातत्याने ड्रेनेज ओव्हरफ्लो होत होते. वर्षभर ड्रेनेज ओव्हरफ्लो झाल्यामुळे घाण मैला घरात येत होता. त्यासंदर्भात पालिकेत कळवूनही दखल घेतली जात नव्हती. त्याविरोधात त्या परिसरातील नागरिकांनी ड्रेनेज चेंबरमध्ये उतरून आज आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन पालिकेकडून संबंधित ड्रेनेजचे काम सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आजचे आंदोलन स्थगित केले.