

Waterlogged soybean and jowar fields in Satara after continuous rainfall, leaving farmers distressed.
Sakal
-हेमंत पवार
कऱ्हाड : खरिपातील पिके काढणीस आली आहेत. मे महिन्यापापासून सुरू झालेला पाऊस ऑक्टोबर महिना संपत आला, तरीही काही पाठ सोडायलाच तयार नाही. शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने काबाडकष्ट करून खरीप हंगामात घेतलेली पिके वादळी पावसाने वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याच्या स्थितीत असल्याने जिल्ह्यातील बळिराजा मात्र हवालदिल झाला आहे.