Satara News : कंत्राटी महिलांनाही आता २६ आठवडे प्रसूती रजा, उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

कंत्राटी शासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या मातृत्व हक्कांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिला.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on

सातारा - कंत्राटी शासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या मातृत्व हक्कांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिला आहे. सातारा जिल्हा परिषदेत पाणीपुरवठा विभागात कंत्राटी कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या वृषाली सुतार यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांनाही २६ आठवड्यांच्या प्रसूती रजेस पात्र असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com