सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल; सोमवारपासून प्रक्रिया सुरु

उमेश बांबरे
Thursday, 11 February 2021

दरम्यान, औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाविरोधात बीड, परभणी, नांदेड जिल्हा बॅंकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे.

सातारा : सहकार निवडणूक प्राधिकरणाने बुधवारी (ता. 10) परिपत्रक काढून सोमवारपासून (ता. 15) सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश सहकार विभागाला दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात जिल्हा बॅंक, "कृष्णा' व "किसन वीर' कारखान्यासह नऊ मोठ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील. जिल्हा बॅंकेची निवडणूक ठरावाच्या टप्प्यावर थांबली होती, तेथूनच पुढे निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे यापूर्वी ठराव केलेल्या विद्यमान संचालकांना दिलासा मिळाला आहे.
 
सहकारी संस्थांच्या "कट ऑफ डेट' ठरवण्याचा अधिकार राज्य निवडणूक प्राधिकारणाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे याबाबत त्यांनी निर्णय घ्यावा, असे नमूद करत औरंगाबाद खंडपीठाने चार बॅंकांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. त्याबरोबरच निवडणुका घेण्यास हरकत नाही, असा निर्णय दिला. त्या आधारे सहकार प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सहकार विभागाला दिले आहेत.

खासदार व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील गुरुवारी (ता.११) ८१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.

पहिल्या टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यातील निवडणूक घोषित करण्यात यावीत, असे आदेशात म्हटले आहे. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी हे आदेश काढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होईल. त्यात जिल्ह्यातील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, कृष्णा कारखाना, किसन वीर कारखान्यासह नऊ मोठ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील. दरम्यान, औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाविरोधात बीड, परभणी, नांदेड जिल्हा बॅंकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. 

एका सिगारेटने केले कोटीचे नुकसान; साताऱ्यात पाच शिवशाही जळून खाक

 

पाटण तालुक्‍यात अमर्याद उत्खननाने कोयनाकाठ धोक्‍यात; महसूलची बघ्याची भूमिका

मुंबईत अडकल्या साताऱ्याच्या 100 गाड्या; लालपरीच्या काळजीने प्रवाशांच्या जीवाला घोर!

शेंद्रे ते कागल महामार्गावर कराड शहरातील वाहतुकीची कोंडी आणि अपघातात दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे.

Edited By : Siddharth Latkar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cooperative Sector Election Process Begins From Monday Satara Marathi News