कुडाळचे सेंटर रुग्णांसाठी संजीवनी ठरेल  : शिवेंद्रसिंहराजे

महेश बारटक्के
Sunday, 27 September 2020

आठ दिवसांत दोन लाखांवर निधी जमा करून आठ बेडची सुविधा निर्माण केलेली असून, प्रशासनाने आवश्‍यक आरोग्य यंत्रणेसह हे केंद्र सुरळीत चालवावे, असेही शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितले. तहसीलदार शरद पाटील यांनी सेंटरला मदत करण्याची ग्वाही दिली.

कुडाळ (जि. सातारा) :  युवक वर्ग व ग्रामस्थांच्या वतीने लोकसहभागातून सुरू करण्यात आलेले येथील कोरोना इमर्जन्सी केअर सेंटर हे जिल्ह्यातील पहिला पायलट प्रोजेक्‍ट रुग्णांसाठी संजीवनी देणारा ठरेल, असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. 

येथील कोरोना इमर्जन्सी केअर सेंटरचे उद्‌घाटन आमदार भोसले यांच्या हस्ते करून लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जावळी पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे, तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते, डॉ. विलास परामणे, डॉ. मनोहर ससाणे, जावळी तालुका शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र शिंदे, मालोजीराव शिंदे, जितेंद्र शिंदे, अरुणा शिर्के, रवींद्र परामणे, डॉ. प्रमोद जंगम, डॉ. अमोल पालवे, कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत वेलकर, डॉ. चव्हाण आदी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांच्या समस्यांचा आता बांधावरच फैसला; कृषिमंत्री दादा भुसेंचे फर्मान

उपसभापती शिंदे म्हणाले, "आठ दिवसांत दोन लाखांवर निधी जमा करून आठ बेडची सुविधा निर्माण केलेली असून, प्रशासनाने आवश्‍यक आरोग्य यंत्रणेसह हे केंद्र सुरळीत चालवावे.'' तहसीलदार शरद पाटील यांनी सेंटरला मदत करण्याची ग्वाही दिली. डॉ. मोहिते यांनी शासनपातळीवर या सेंटरसाठी आवश्‍यक मनुष्यबळ निर्माण करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. डॉ. ससाणे व डॉ. परामणे यांनी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. सेंटरसाठी आखाडे येथील उद्योजक सचिन शिंदे व संदीप शिंदे, कुडाळ येथील उदयसिंह शिंदे व लोकसहभागातून एक अशा तीन ऑक्‍सिजन मशिन सुपूर्द करण्यात आल्या. ज्ञानेश्वर शेलार यांनी वॉटर प्युरिफायर भेट दिला. तर, शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने 30 हजार रुपयांची रोख मदत करण्यात आली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Care Center Was Inaugurated By MLA Shivendrasinharaje Bhosale Satara News