Video पहा : Coronafighter आजी काळाच्या पडद्याआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anusya Ghadge

सगळ काही व्यवस्थित सुरु असताना अनुसया आजींना त्यानंतर काही दिवसांतच देवाज्ञा झाली. यामुळे कुटुंबियांसह परिसरातील ग्रामस्थ हळहळले.

Video पहा : Coronafighter आजी काळाच्या पडद्याआड

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : त्यांचे वय वर्षे 83. अनेक साथी, पावसाळे, वादळं आली अन गेली. त्या कधी डगमगल्या नाहीत. पण कोरोनाने त्यांना गाठलेच. मात्र त्या एवढ्या जिद्द च्या की त्यांनी कोरानालाही (coronavirus) हरवले. एवढेच नाही तर हवालदिल झालेल्या इतरांनाही त्या धीर देत राहील्या. मात्र नियतीपुढे कोणाचेच चालत नाही हेच खरे. जावळी तालुक्यातील (jawali) बिभवीच्या अनुसया शेडगे यांची प्राणज्योत कोरोनाला हरवून इतरांना धीर देत देत विझली. corona-fighter-anusaya-ghadge-no-more-satara-marathi-news

दुर्दम्य इच्छाशक्ती व लढण्याची जिद्द असेल तर कोरोना तुमचं काही बी बिघडवू शकत नाही. याच उदाहरण बिभवी (ता. जावली) येथील आजींनी दाखवून दिले हाेते. आज्जी श्रीमती अनुसया बाबुराव शेडगे ह्या कोरोना वर मात करुन घरी परतल्या. दवाखान्यात दाखल करते वेळी ऑक्सीजन लेव्हल 50 होती. एचआरसीटी स्काेर 22 होता. अशा बिकट परिस्थितीत शेडगे यांची जगण्याची शक्यता फारचं कमी होती.

मेढा ग्रामीण रुग्णालयात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून ऑक्सिजन बेड मिळवण्यात यश आले. बेड मिळाल्यावर सुरू झाली कोरोना विरूद्धची लढाई. मेढा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर चंद्रकांत यादव, डॉ. रमेश कदम व सहकारी यांच्या अथक परिश्रमाने व आजींच्या जिद्दीने कोरोनाला हरवण्यात यश आले. घरी परतलेल्या आजींचे आरती ओवाळून स्वागत करण्यात आले. त्यानंतर आजींनी काेराेनाची लढाई कशी जिंकायची याचे धडेच अनेकांना दिले. त्यांच्या लढाईच्या प्रेरणेतून अनेकांना कोरोना विरूद्ध लढण्यासाठी बळ मिळाले.

हेही वाचा: न लिहिलेली बातमी...

सगळ काही व्यवस्थित सुरु असताना अनुसया आजींना त्यानंतर काही दिवसांतच देवाज्ञा झाली. यामुळे कुटुंबियांसह परिसरातील ग्रामस्थ हळहळले.

काही सुखद बातम्या वाचा

हेही वाचा: आता शिवभोजन थाळी मिळणार १४ जूनपर्यंत माेफत

corona-fighter-anusaya-ghadge-no-more-satara-marathi-news

loading image
go to top