esakal | Corona Update : साताऱ्यासह कऱ्हाड, फलटण, खटावातील रुग्णांत मोठी वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

जिल्ह्यातील कोरोना रूग्णवाढीचा आलेख कमी करण्यासाठी नियोजन करतानाच, स्थानिक पातळीवरील प्रशासनालाही वारंवार सूचनांचा टेकू देणे गरजेचे झाले आहे.

Corona Update : साताऱ्यासह कऱ्हाड, फलटण, खटावातील रुग्णांत मोठी वाढ

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सातारा : जिल्ह्यातील कोरोना (Coronavirus) रूग्णवाढीचा आलेख कमी करण्यासाठी नियोजन करतानाच, स्थानिक पातळीवरील प्रशासनालाही वारंवार सूचनांचा टेकू देणे गरजेचे झाले आहे. कराड तालुक्यात (Karad Taluka) एका बाजूला रूग्णवाढीचा वेग कायम असताना आता दुसरीकडे मृत्यू संख्याही वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात काल (मंगळवार) रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार, 1012 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून 14 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी (District Health Officer) दिली. (Corona Infection Increased In Karad, Phaltan, Khatav At Satara District bam92)

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 15(9101), कराड 267 (32935), खंडाळा 66 (12622), खटाव 101 (21041), कोरेगांव 71(18312), माण 76 (14134), महाबळेश्वर 10 (4446) पाटण 12(9351), फलटण 138 (29851), सातारा 188(43144), वाई 63 (13800) व इतर 5 (1567) असे आजअखेर एकूण 210904 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

हेही वाचा: साताऱ्याच्या आरोग्य अधिकारीपदी बीडच्या राधाकिशन पवारांची नियुक्ती

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 0 (191), कराड 3 (993), खंडाळा 2 (160), खटाव 1 (500), कोरेगांव 0 (396), माण 1 (291), महाबळेश्वर 0 (85), पाटण 0 (316), फलटण 1 (492), सातारा 4 (1294), वाई 2 (313) व इतर 0 (71), असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5102 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Corona Infection Increased In Karad, Phaltan, Khatav At Satara District bam92

loading image