esakal | साताऱ्याच्या आरोग्य अधिकारीपदी बीडच्या राधाकिशन पवारांची नियुक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

Radhakishan Pawar

गेल्या अडीच वर्षांपासून जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ. अनिरुद्ध आठल्ये कार्यरत होते. कोरोनाच्या काळात त्यांनी उत्कृष्टपणे काम केले होते.

साताऱ्याच्या आरोग्य अधिकारीपदी बीडच्या राधाकिशन पवारांची नियुक्ती

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : गेल्या महिनाभरापासून जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून प्रभारी असणारा कार्यभार आता पूर्णवेळ अधिकारी सांभाळणार आहेत. बीड जिल्हा आरोग्य अधिकारी (Beed District Health Officer) असणारे राधाकिशन पवार (Radhakishan Pawar) यांची सातारा जिल्हा आरोग्य अधिकारीपदी (Satara District Health Officer) नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापूर्वी डॉ. अनिरुद्ध आठल्ये (Dr. Aniruddha Athalye) हे रत्नागिरी या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर गेल्याने त्या ठिकाणचा प्रभारी कार्यभार डॉ. सचिन पाटील (Dr. Sachin Patil) यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र, डॉ. पवार यांच्या बदलीचा आदेश काल काढण्यात आला असून, येत्या आठवडाभरात जिल्हा आरोग्य अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. (Appointment Of Radhakishan Pawar As Satara District Health Officer bam92)

गेल्या अडीच वर्षांपासून जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ. अनिरुद्ध आठल्ये कार्यरत होते. कोरोनाच्या काळात त्यांनी उत्कृष्टपणे काम केले होते. मात्र, जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत असताना त्यांची अचानक रत्नागिरी या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर बदली झाली. त्यामुळे या प्रभारी पदाचा कार्यभार डॉ. पाटील यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनीही कामाची चुणूक दाखवित कामाचा ठसा उमटविला आहे. मात्र, राज्यभरातील जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत असल्याने या पदावर पूर्णवेळ अधिकाऱ्याची आवश्‍यकता होती. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ. पवार यांची बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा: लस घ्यायला निघालात? सोबत आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन जा!

दरम्यान, डॉ. पवार हे २०११ बॅचचे अधिकारी असून, सुरुवातीला ते बीड या ठिकाणी माता बाल संगोपन अधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर त्यांची मुंबईत आरोग्य विभागात सहायक संचालकपदी नियुक्ती झाली होती. त्यांनी नंदुरबार व उस्मानाबाद या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर असताना कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. याचबरोबर बीडमध्ये आरोग्य अधिकारी असताना डॉ. पवार यांनी प्रधानमंत्री मातृत्व योजना, जननी सुरक्षा अभियान, आयुष्यमान भारत कार्यक्रम, ऊसतोडणी मजुरांसाठी आयुमंगलम योजना अतिशय प्रभावीपणे राबविण्यात आल्या होत्या.

हेही वाचा: 'जनरेट्यापुढं भले-भले झुकतात; ईडीनं कारवाईचं धाडस बंद करावं'

सातारा जिल्हा आरोग्य अधिकारीपदी बदलीचा आदेश आला आहे. त्या ठिकाणी येत्या आठवडाभरात रुजू होणार आहे.

डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

‘सकाळ’ची बातमी ठरली खरी

जिल्हा आरोग्य अधिकारीपदी राधाकिशन पवार हे रुजू होणार असल्याची बातमी दै. ‘सकाळ’ने गेल्या चार दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली होती. अखेर डॉ. पवार यांची बीड जिल्ह्यातून सातारा जिल्हा आरोग्य अधिकारीपदावर बदली झाल्याचा आदेश राज्य शासनाने काढल्याने ‘सकाळ’ने दिलेली बातमी खरी ठरली.

Appointment Of Radhakishan Pawar As Satara District Health Officer bam92

loading image