जेवायला एकत्र बसल्याने बाधित?; शासकीय कार्यालयात सामसूम!

बाळकृष्ण मधाळे
Wednesday, 16 September 2020

सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सोमवारी एक विस्तार अधिकारी बाधित झाल्याचे समजताच थोडीशी भीती निर्माण झाली. परंतु, ते विस्तार अधिकारी गेले काही दिवस कार्यालयात आलेच नव्हते. त्यामुळे कार्यालयातील कर्मचा-यांनी सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान, सातारा पंचायत समितीत तर प्रत्येक विभागात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडताना दिसत आहे.

सातारा : राज्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आणि उपाययोजना करण्यात येत असले तरी, रुग्णांचा आकडा वाढत आहे. दिवसेंदिवस जिह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीतही कमलीची वाढ होत आहे. रोजचा बाधितांचा आकडा हा हजाराच्या पटीत वाढत आहे. कोरोनाची प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. सरकारी कार्यालयात शेजारच्या टेबलवरचा बाधित झाल्याचे ऐकून धक्का बसत आहे, तर कधी स्वतःच कर्मचारी कॉरंटाइन होण्याचा निर्णय घेत आहेत. 

सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सोमवारी एक विस्तार अधिकारी बाधित झाल्याचे समजताच थोडीशी भीती निर्माण झाली. परंतु, ते विस्तार अधिकारी गेले काही दिवस कार्यालयात आलेच नव्हते. त्यामुळे कार्यालयातील कर्मचा-यांनी सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान, सातारा पंचायत समितीत तर प्रत्येक विभागात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडताना दिसत आहे. एकेका टेबलवर चार-चार जण काम करताना दिसत असून जिल्हा परिषदेतील अनेकजण आऊटऑफ रजेवर गेले आहेत. 

काँग्रेस आमदारांच्या उत्तराने उलट-सुलट चर्चांना पूर्णविराम 

शासकीय कार्यालयात कोरोनाची मोठी दहशत निर्माण झाली आहे. प्रत्येक जण कोणी ना कोणी कोणाच्या संपर्कात नेहमी येतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कधी कसा होतो हे समजत नाही. मात्र, आपल्या बाजूच्या टेबलवर काम करणारे आपल्याशी दररोज बोलणारे, दुपारच्या जेवणावेळी एकत्र बसणारे कोरोना बाधित झाल्याचे समजते. तेव्हा इतर कर्मचा-यांची झोप उडत आहे. त्यामुळे अनेकांनी शासकीय कार्यालयात येणे टाळले आहे.

Video : श्रीनिवास पाटलांनी लाेकसभेत माेदी सरकारवर डागली ताेफ

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सकाळी-सकाळी आपल्यातील एकजण बाधित आहेत, तर एकाचे वडील बाधित झाल्याची चर्चा सुरू झाली. एक विस्तार अधिकारी दोन दिवसांपूर्वी बाधित झाले असून ते चार दिवसांपासून जिल्हा परिषदेत आले नाहीत. तर दुसरे कर्मचारी ही कार्यालयात आले नव्हते. काम नियमितपणे सुरु होते, तर काही कर्मचा-यांनी सुट्टी घेतली होती. वाढत्या बाधितांच्या आकडेवारीला लगाम घालण्यासाठी प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, अन्यथा हा प्रादुर्भाव असाच वाढत राहणार आहे. आज जिल्ह्याची परिस्थिती पाहता मोठा धोका निर्माण झाला असून नागरिकांनी वेळीच धोका ओळखून काळजी घेणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Influence Increased In Satara District Satara News