'तुम्हाला काय करायचं ते करा'; कोरोनाग्रस्त दांपत्याचं दहिवडीतून पलायन

Corona Positive
Corona Positiveesakal

गोंदवले (सातारा) : विलगीकरण केंद्रात (Quarantine Centre) दाखल होण्याबाबत आग्रह केल्यावर कोरोनाबाधित (Corona Patient) दांपत्याने थेट परजिल्ह्यात पलायन केल्याची घटना माणमध्ये घडली. वाघमोडेवाडी येथील या दांपत्यावर दहिवडी पोलिस ठाण्यात (Dahiwadi Police Station) संसर्गजन्य कायदा उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Corona Positive Couple Ran Into Other State Satara Marathi News)

Summary

वाघमोडेवाडीत या दांपत्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावरही ते घरातच राहात होते.

वाघमोडेवाडीत या दांपत्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावरही ते घरातच राहात होते. गावातील आपत्ती व्यवस्थापन समितीने त्यांना शाळेतील विलगीकरण केंद्रात दाखल होण्यास सांगितले; परंतु त्यांनी नकार दिला. याच दरम्यान तहसीलदार बाई माने (Tehsildar Bai Mane) या घटनास्थळी पोचल्या. त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न करूनही नकार देणाऱ्या या दांपत्याला रुग्णवाहिकेतून थेट दहिवडीतील विलगीकरण केंद्रात आणण्यात आले. मात्र, तेथे पोचताच या दांपत्याने आपला चतुरपणा दाखवत फोन करून बोलाविलेल्या नातेवाइकाच्या वाहनातून पलायन केले.

Corona Positive
जिल्हाधिकाऱ्यांचे धरणग्रस्तांकडे दुर्लक्ष; वर्षभरात कोयना टास्क फोर्सची बैठकच नाही!

या वाहनातून त्यांनी तालुक्याबाहेर नव्हे तर चक्क जिल्ह्याबाहेरील नातेपुते गाठले. येथे पोचल्यावर या दांपत्याने वाघमोडेवाडीचे सरपंच उमेश वाघमोडे यांना फोन करून 'आता तुम्हाला काय करायचं आहे ते करा, आम्ही इकडे आलो आहे,' असेही सांगितले. साथरोग नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीसह इतर लागू केलेल्या नियमांचेही उल्लंघन केल्याने या बाधित दांपत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सरपंच उमेश वाघमोडे यांनी याबाबतची फिर्याद दिली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ (Police Rajkumar Bhujbal) यांनी दिली.

Corona Positive Couple Ran Into Other State Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com