साताऱ्यात 107 जणांचे अहवाल 'पाॅझिटीव्ह'; 11 बाधितांचा मृत्यू

साताऱ्यात 107 जणांचे अहवाल 'पाॅझिटीव्ह'; 11 बाधितांचा मृत्यू

सातारा : जिल्ह्यात गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 107 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यy झाला आहे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोराना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 1, मंगळवार पेठ 1, शनिवार पेठ 4, शुक्रवार पेठ 1, चिमणपुरा पेठ 3, राधिका रोड 1, करंजे 1, शाहूपुरी 2,  कृष्णानगर 4,   शाहूपुरी 1,  तामाजाईनगर 1, सत्वशिलनगर 1, संभाजीनगर 1,   देगाव फाटा 1, शेरेवाडी 1, देगाव 1, पाडळी 1, कराड तालुक्यातील यशवंतनगर 1,  विद्यानगर 1, निगडी 1, जाखीणवाडी 1, ओंड 2, काले 2, पाटण तालुक्यातील पाटण 2, मुद्रुळकोळे 2, आंबले 2, फलटण तालुक्यातील फलटण 2, लक्ष्मीनगर 2, मिरेवाडी 1, दारेचीवाडी 1, साखरवाडी 6, सुरवडी 1, तरडगाव 1, खटाव तालुक्यातील खटाव 2, दारुज 1,वेटने 1, म्हासुर्णे 1, कातरखटाव 1, माण  तालुक्यातील बोराटेवाडी 1, गोंदवले बु 1, राणंद 2, मलवडी 1, गोंदवले खु 2, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, रहिमतपूर 9, दुधी 1, वाठार 1, सातारा रोड 1, कटापूर 1,अंभेरी 1, वाठार किरोली 1, अपशिंगे 1,एकसळ 1, कुमठे 1, जावली तालुक्यातील रायगाव 1, बीबवी 1, सांगवी कुडाळ 1, वाई तालुक्यातील रामढोह 1, आसले 2, भुईंज 1, खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, नायगाव 1, महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 2, इतर 2, फडतरवाडी 1, रावडी 1, पिंपळवाडी 1, मुरुम 1, बाहेरील जिल्ह्यातील पेठ 1, पुणे 1 यांचा समावेश आहे.  

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये धारपुडी (ता. खटाव) येथील 47 वर्षीय महिला, संगमनगर येथील 85 वर्षीय पुरुष, अैनाचीवाडी (ता. पाटण) येथील 80 वर्षीय पुरुष, केंजळ (ता. जावली) येथील 80 वर्षीय पुरुष, वावरहिरे (ता. माण) येथील 51 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये पर्यंती (ता. माण) 80 वर्षीय पुरुष, बोरखळ (ता. सातारा) येथील 42 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ (ता. सातारा) येथील 56 वर्षीय पुरुष. रात्री उशिरा कळविलेले खेड (ता. सातारा) येथील 85 वर्षीय पुरुष, कोडोली (ता. सातारा) येथील 65 वर्षीय पुरुष, वडूज (ता. खटाव) येथील 68 वर्षीय पुरुष अशा एकूण 11 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने - 225674
एकूण बाधित - 49404  
घरी सोडण्यात आलेले - 46654  
मृत्यू - 1670 
उपचारार्थ रुग्ण - 1080

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com