esakal | साताऱ्यासह कऱ्हाड, फलटण, खंडाळ्यात कहर; बाधितांत मोठी वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

जिल्ह्यात तब्बल चार दिवसांनंतर हजारच्या खाली कोरोना बाधित आढळून आल्याने दिलासा मिळाला आहे. पॉझिटीव्हीटी रेटही कमी झाला आहे.

साताऱ्यासह कऱ्हाड, फलटण, खंडाळ्यात कहर; बाधितांत मोठी वाढ

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सातारा : जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या वाढीने दोन दिवसांपासून हजारचा आकडा ओलांडला असून कराड, खंडाळा, कोरेगांव, फलटण तालुक्यातील वेगाने वाढत असलेला आकडा प्रशासनाची डोकेदुखी बनला आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार, 1017 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 20 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी (Health Officer) दिली. (Corona Test Positive Of 1017 Citizens In Satara District Today Corona Update bam92)

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 31 (8971), कराड 247 (31653), खंडाळा 94 (12382), खटाव 74 (20588), कोरेगांव 90 (17958), माण 64 (13793), महाबळेश्वर 10 (4407), पाटण 59 (9221), फलटण 105 (29388), सातारा 195 (42805), वाई 38 (13420) व इतर 10 (1505) असे आजअखेर एकूण 206091 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

हेही वाचा: लसीकरणात बाहेर गावच्या लोकांवर अन्याय

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 1 (186), कराड 13 (947), खंडाळा 0 (156), खटाव 0 (491), कोरेगांव 1 (387), माण 0 (288), महाबळेश्वर 0 (85), पाटण 2(312), फलटण 1 (487), सातारा 1 (1267), वाई 1 (309) व इतर 0 (71), असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4986 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Corona Test Positive Of 1017 Citizens In Satara District Today Corona Update bam92

loading image