esakal | सातारकरांना मोठा दिलासा! जिल्ह्यात बाधितांची संख्या झाली कमी, मृत्यूदर कायम
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

सातारकरांना मोठा दिलासा! जिल्ह्यात बाधितांची संख्या झाली कमी, मृत्यूदर कायम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : मुंबई, ठाणे, पुण्यातील बाधित वाढीचा वेग कमी आलेला आहे. मात्र, सातारा जिल्ह्यात दैनंदिन 2 हजारांच्या पुढे होणारी कोरोना बाधित (Coronavirus) वाढ थांबत नाही. मुंबई, ठाणे या मोठ्या शहरांशी तुलना केली, तर सातारा जिल्ह्याची कोरोना बाधित वाढ चिंताजनक आहे. मात्र, आज जिल्ह्याला काहीअंशी दिलासा मिळाला आहे. सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 1621 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 45 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. (Corona Test Positive Of 1621 Citizens In Satara District)

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 80 (6064), कराड 250 (18579), खंडाळा 82 (7805), खटाव 172 (11103), कोरेगांव 78 (10757),माण 234 (8514), महाबळेश्वर 23 (3568), पाटण 96 (5197), फलटण 206 (16863), सातारा 287 (28592), वाई 92 (9436 ) व इतर 21 (718) असे आजअखेर एकूण 127196 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

लसीकरणासाठी पुणे-कोल्हापुरातील लोक सातारा केंद्रांवर; ई-पासशिवाय बाहेरच्यांना जिल्ह्यात प्रवेश?

आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 2 (129), कराड 6 (511), खंडाळा 2 (100), खटाव 3 (303), कोरेगांव 3 (266), माण 2 (165), महाबळेश्वर 1 (39), पाटण 1 (130), फलटण 8 (218), सातारा 11 (857), वाई 6 (244) , व इतर 0, असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2962 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Corona Test Positive Of 1621 Citizens In Satara District