esakal | साताऱ्यात मृत्यूतांडव सुरुच! 24 तासात 2383 बाधित, तर आजअखेर 2530 जणांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

Corona
साताऱ्यात मृत्यूतांडव सुरुच! 24 तासात 2383 बाधित, तर आजअखेर 2530 जणांचा मृत्यू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत बाधितांचा आकडा वाढत चालला असून दररोज जिल्ह्यात दोन हजाराच्या पुढे बाधित आढळून येत आहेत. नवनवे रेकॉर्ड होत आहेत. बाधितांचा प्रमाण कमी आणण्यासाठी प्रशासनापुढे आव्हान असून पॉझिटिव्हिटी रेट काही केल्या कमी होईना, अशी जिल्ह्याची अवस्था आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या पाहून काळजाचा थरकाप उडत आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 2383 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 34 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 117 (4941), कराड 309 (15953), खंडाळा 209 (6474), खटाव 145 (8971), कोरेगांव 273 (8853),माण 123 (6499), महाबळेश्वर 25 (3294), पाटण 71 (4300), फलटण 406 (13361), सातारा 515 (24132), वाई 165 (8004 ) व इतर 25 (548) असे आजअखेर एकूण 105350 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

'पोक्सो' : गुन्हेगारांना भीती तर नागरिकांच्या पाल्यांना कवच, जाणून घ्या सामान्य माहिती

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 1 (104), कराड 7 (439), खंडाळा 0 (82), खटाव 3 (256), कोरेगांव 1 (234), माण 0 (141), महाबळेश्वर 1 (32), पाटण 1 (119), फलटण 3 (187), सातारा 9 (742), वाई 8 (194) , व इतर 0, असे आजअखेर जिल्ह्यात एकूण 2530 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.