esakal | साताऱ्यात कोरोनाचा विस्फोट! नव्या रेकॉर्डसह जिल्ह्यात 2502 बाधित, तर 36 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

साताऱ्यात कोरोनाचा विस्फोट! नव्या रेकॉर्डसह जिल्ह्यात 2502 बाधित, तर 36 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : दररोज जिल्ह्यात दोन हजाराच्या पुढे बाधित आढळून येत आहेत. नवनवे रेकॉर्ड होत आहेत. बाधितांचा प्रमाण कमी आणण्यासाठी प्रशासनापुढे आव्हान असून पॉझिटिव्हिटी रेट काही केल्या कमी होईना अशी जिल्ह्याची अवस्था आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या पाहून काळजाचा थरकाप उडत आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 2502 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 36 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे. जावली 126 (5240), कराड 233 (16378), खंडाळा 157 (6765), खटाव 173 (9350), कोरेगांव 192 (9252), माण 337 (6980), महाबळेश्वर 9 (3379), पाटण 136 (4463), फलटण 388 (13977), सातारा 585 (25211), वाई 151 (8289 ) व इतर 15 (594) असे आजअखेर एकूण 109878 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

जावलीत कोरोनाचा कहर; तालुक्यात 115 हून अधिक रुग्णांचा बळी, प्रशासनाकडून तत्काळ 'दखल'

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे. जावली 1 (105), कराड 0 (449), खंडाळा 0 (85), खटाव 6 (268), कोरेगांव 5 (239), माण 4 (147), महाबळेश्वर 0 (32), पाटण 1 (120), फलटण 1 (194), सातारा 15 (770), वाई 3 (201) व इतर 0, असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2610 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

loading image