esakal | धक्कादायक! कऱ्हाडात आरोग्य, पाणीपुरवठा, अग्निशमनदलातील कर्मचारी बाधित; प्रशासन सतर्क

बोलून बातमी शोधा

corona
धक्कादायक! कऱ्हाडात आरोग्य, पाणीपुरवठा, अग्निशमनदलातील कर्मचारी बाधित; प्रशासन सतर्क
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : पालिकेतील वेगवेगळ्या विभागातील पाच कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत. पालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कोरोना टेस्ट सक्तीच्या केल्या आहेत. त्या टेस्टमध्ये पाच कर्मचारी बाधित आढळले आहेत. त्यांच्या संपर्कातील हाय रिस्कच्या कर्मचाऱ्यांना घरीच क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आले आहे.

आरोग्य, पाणीपुरवठा, अग्निशमन, नागरी उपजीविका अभियान व कंत्राटी पद्धतीने स्वॅब टेस्टचे काम करणाऱ्यांचा त्यात समावेश आहे. पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मध्यंतरी चाचणी सक्तीची केली होती. त्या वेळी पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या कमी होती. मात्र, त्यानंतर 12 दिवसांनी पालिकेतील कर्मचारी पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. पालिकेत पाच कर्मचारी बाधित आहेत. त्यांना बेड उपलब्ध नसल्याची शोकांतिका आहे.

वाह, क्या बात है! जावळीत होणार ऑक्‍सिजन प्लांट, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा पुढाकार

अत्यावश्‍यक सेवेत काम करणाऱ्या पालिकेतील कर्मचारी बाधित असतानाही त्यांना बेड नाहीत. सध्या घरीच विलगीकरणात आहेत. त्यातील काहींना रुग्णालयात हलवावे लागणार आहे. बेड उपलब्ध नसल्याने मोठी बिकट स्थिती झाली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके बेड मिळावा, यासाठी प्रयत्न करत आहेत. पालिकेतील पाणीपुरवठा, आरोग्य, अग्निशमन दल, नागरी उपजीविका अभियान विभागातील कर्मचारी पॉझिटिव्ह आहेत. त्याशिवाय पालिकेत कोरोना टेस्ट घेणारे दोन कंत्राटी पद्धतीचे कर्मचारीही पॉझिटिव्ह आले आहेत.

Edited By : Balkrishna Madhale