esakal | साताऱ्याला घट्ट विळखा; कऱ्हाड, खटाव, कोरेगांव, फलटणात धोका कायम!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा आलेख पुन्हा एकदा हजाराकडे निघाला असून जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

साताऱ्याला घट्ट विळखा; कऱ्हाड, खटाव, कोरेगांव, फलटणात धोका कायम!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सातारा : जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा (Corona Patient) आलेख पुन्हा एकदा हजाराकडे निघाला असून जिल्ह्यासाठी आणि नियम न पाळणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण, गेल्या आठ दिवसांत आरटीपीसीआर चाचण्यांच्या (RTPCR Test) सरासरी टक्केवारीचा विचार करता पॉझिटिव्हीटी रेट वाढला असून तो 10 टक्क्यांच्या पुढे पोहोचला आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 961 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 26 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी (Satara Health Officer) दिली. (Corona Update 961 People Report Positive For Coronavirus And 26 Died Today In Satara District)

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 42 (8747), कराड 323 (29320), खंडाळा 17 (12009), खटाव 117 (20053), कोरेगांव 79 (17223), माण 47 (13387), महाबळेश्वर 11 (4335), पाटण 35 (8783), फलटण 70 (28764), सातारा 152 (41352), वाई 46 (12940) व इतर 22 (1405) असे आजअखेर एकूण 198318 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

हेही वाचा: धक्कादायक! लसीकरण मोहिमेत 'घोटाळा', अनेकांकडून पदाचा गैरवापर

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 0 (181), कराड 12 (893), खंडाळा 1 (153), खटाव 2 (465), कोरेगांव 2 (378), माण 0 (279), महाबळेश्वर 0 (84), पाटण 1 (299), फलटण 4 (461), सातारा 3 (1230), वाई 0 (302) व इतर 1 (69), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4794 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Corona Update 961 People Report Positive For Coronavirus And 26 Died Today In Satara District

loading image