Corona Update : साताऱ्यात दोघा कोरोनाबाधितांचा मृत्‍यू

घाबरू नका... दक्षता घ्या! शाळा, शासकीय कार्यालय, बँकांमध्ये मास्‍कसक्‍ती
corona update Death of two corona patients in satara Masks compulsory in school government offices bank
corona update Death of two corona patients in satara Masks compulsory in school government offices bankesakal
Updated on

सातारा : जिल्ह्याच्‍या विविध भागांत कोरोना आणि सिझनल इन्‍फ्‍यूएन्‍झा आजारांचा प्रसार होऊ लागला आहे. सध्‍या कोरोनाबाधित ४५ रुग्‍ण असल्‍याचे समोर आले असून, त्‍यांच्‍यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. आज उपचारादरम्‍यान दोन बाधितांचा मृत्यू झाल्‍याची माहिती जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने देण्‍यात आली.

वाढत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्‍या लक्षात घेत जिल्‍हा प्रशासन सतर्क झाले असून, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, कोरोनाबाधितांच्‍या वाढणाऱ्या संख्‍येमुळे जिल्‍हा प्रशासन सतर्क झाले असून, जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांबरोबरच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँकांमधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्कचा वापर करण्‍याची सक्‍ती करण्‍यात आली असून, याबाबतचा आदेश जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी जाहीर केला.

दरम्यान जयवंशी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक, सर्व तालुका आरोग्य अधिकारी व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली.

चाचण्या वाढवण्यासह आवश्यक उपाययोजना सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानुसार त्याची अंमलबजावणीची कार्यवाही आजपासूनच सर्व शासकीय रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. दरम्यान गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवावे, असेहीबँका, शाळा, महाविद्यालयांत मास्‍कसक्‍ती करण्‍यात आल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.

कोरोनाचा प्रसार रोखण्‍यासाठी गत दोन वर्षांपूर्वी जाहीर करण्‍यात आलेल्‍या लॉकडाउनमुळे संपूर्ण जगभरातील जनजीवन ठप्‍प झाले होते. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्‍यासाठी आरोग्‍य यंत्रणा पूर्ण सतर्क झाली होती. लसीकरण व इतर उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करत कोरोनाची साथ आटोक्‍यात आणण्‍यात यश आले. कडकडीत लॉकडाउन शिथिल केल्‍यानंतर अंशत: लॉकडाउन जाहीर करत शासनाने नागरिकांच्या हालचालींवर मर्यादा आणल्‍या होत्‍या. या मर्यादा पूर्णतः शिथिल झाल्‍यानंतर संपूर्ण जनजीवन पूर्वपदावर येण्‍यास सुरुवात झाली.

शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, सार्वजनिक वाहतूक व इतर यंत्रणांचे कामकाज यानंतर पूर्ण क्षमतेने सुरू झाले. गत दीड वर्षे कोरोनाची कोणतीही छाया जिल्ह्यात जाणवत नव्‍हती. याच दरम्‍यान एच २-एन ३ विषाणूमुळे बाधित होणाऱ्यांची संख्‍या वाढीस लागली. या विषाणू, तसेच कोरोनाचा फैलाव पुन्‍हा होऊ लागल्‍याने स्थिरावलेला समाजमन पुन्‍हा एकदा धास्‍तावले आहे.

त्‍यातच गेल्‍या सहा दिवसांत कोरोनामुळे ४५ जण बाधित झाल्‍याचे समोर आले. या बाधितांवर उपचार सुरू असतानाच आज दोघांचा मृत्यू झाल्‍याचा अहवाल जिल्‍हा प्रशासनाने जाहीर केला. एकाच दिवशी दोघांचा मृत्‍यू झाल्‍याने जिल्‍हा प्रशासन सतर्क झाले असून, त्‍यांनी आवश्‍‍यक त्‍या उपाययोजना राबविण्‍यास सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com