esakal | 'केस मिटवून घ्या, नाही तर कोर्टात या'; कोरोनाच्या महामारीत 'बहुरुपी' अडचणीत

बोलून बातमी शोधा

Bahurupi
'केस मिटवून घ्या, नाही तर कोर्टात या'; कोरोनाच्या महामारीत 'बहुरुपी' अडचणीत
sakal_logo
By
यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (सातारा) : "विनापगारी फुल अधिकारी',"केस मिटवून घ्या, नाही तर रविवारी कोर्टात या' "31 फेब्रुवारीला काळ्याकुट्ट उजेडात साडेबत्तेचाळीस वाजता तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे,' अशी गंभीर वाक्‍ये विनोदी शैलीत म्हणून भुरळ पाडणारे बहुरुपीही अडचणीत आले आहेत. कोरोनाच्या संकटात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

उस्मानाबाद, जामखेड, अकलूज या परिसरात बहुरुपी समाज वास्तव्यास आहे. अकलूज येथील अर्जुन साळुंखे हे पारंपरिक बहुरुपी व्यवसायाच्या निमित्ताने तारळेत आले होते. ते म्हणाले,""लहानपणी वडिलांच्या भटकंतीमुळे शिक्षण घेता आले नाही. आमची आशिक्षित पिढी पारंपरिक व्यवसाय पुढे नेत आहे. आम्हाला शिक्षण घेता आले नाही. मात्र, मुलांना शिक्षण द्यायसाठी धडपड सुरू आहे. आमचे हाल पाहून पुढील पिढी या व्यवसायात येईल का, याबाबत शंका आहे. ही पिढी सध्या या व्यवसायात आहे. मात्र, आता तितक्‍याशा प्रमाणात लोकांकडून दाद मिळत नाही. दिवसभर तोंड वाजवून 50 ते 100 रुपये मिळतात. सरकारने आमच्यासाठी काही तरी ठोस करावे.''

काय सांगता! फोटोग्राफरच्या बंगल्यात राहतात Canon, Nikon, Epson; वाचा 'क्लिक'ची भन्नाट स्टोरी

Edited By : Balkrishna Madhale