esakal | काय सांगता! फोटोग्राफरच्या बंगल्यात राहतात Canon, Nikon, Epson; वाचा 'क्लिक'ची भन्नाट स्टोरी
sakal

बोलून बातमी शोधा

Click Bungalow

काय सांगता! फोटोग्राफरच्या बंगल्यात राहतात Canon, Nikon, Epson; वाचा 'क्लिक'ची भन्नाट स्टोरी

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : आयुष्यात येऊन प्रत्येकाला वेगळं काहीतरी करण्याचा छंद असतोच असतो. प्रत्येकजण आपलं 'आयुष्य' वेगळ्या पध्दतीनं जगण्याचा प्रयत्न करतो. त्यात त्याला कधी अपयश येतं, तर कधी तो यशस्वी होतचं पुढे जात असतो. मात्र, या सगळ्यात तो आनंद आणि समाधान शोधण्याचा निश्चित प्रयत्न करतो. प्रत्येक व्यक्तीला कशाचा ना कशाचा छंद असतोच. कुणाला संगिताचा, कुणाला चित्रकलेचा, कुणाला नृत्याचा, कुणाला खेळाचा तर कुणाला फिरण्याचा... परंतु, आपला छंद जोपासणं आणि त्यातून नवनिर्मिती करणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. पण, एका फोटोग्राफरनं मात्र आपला छंद आपल्या घराच्या माध्यमातून जोपासलाय... तोही अतिशय वेगळ्या पद्धतीनं... या फोटोग्राफरच्या कल्पकतेनं सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. त्याने लढवलेली शकल नक्कीच सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे.

आज बरेचजण आपल्या व्यवसायावर अफोट प्रेम करतात आणि यातूनच काहीतरी वेगळं शोधण्याची कल्पकता सुचते आणि साकारलं जातं 'कॅमेऱ्याचं घर'! हो, कॅमेऱ्याचचं घर.. आयुष्याभर ज्या कॅमेऱ्यानं आपल्याला साथ दिली, आपला संसार उभारला.. अनेकांची कॅमेऱ्याच्या माध्यमातून संसाराची क्षणचित्रे टिपली.. त्याच कॅमेऱ्याप्रति कोणी घरं उभारेल, असं ऐकायला थोडं अवघड वाटतंय; पण हे खरं आहे. या फोटोग्राफरला आपल्या कॅमेऱ्यांवर इतकं प्रेम आहे की, त्यानं आपल्या मुलांचं नामकरणंही कॅमेऱ्याच्या कंपन्यांच्या नावावरूनच केलंय. इतकंच नाही तर त्यानं आपलं घरही कॅमेऱ्याच्या आकाराचं बनवून घेतलंय. कर्नाटकच्या बेळगावीमध्ये राहणाऱ्या 50 वर्षीय रवि होंगल हे व्यावसायिक फोटोग्राफर आहेत. त्यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तीन मजल्यांचं एक घर उभारलंय. हे घर चक्क कॅमेऱ्याच्या आकारात बनवण्यात आलंय. त्याचं नामकरण 'क्लिक' असं करण्यात आलं.

Camera Click

Camera Click

होंगल दाम्पत्यानं आपल्या मुलांची नावंही कॅमेऱ्याच्या ब्रॅन्डवरून ठेवली आहेत. कॅनन, निकॉन आणि एप्सॉन अशी या मुलांची नावं आहेत. होंगल यांना हे घर उभारण्यासाठी तब्बल 71-72 लाखांचा खर्च आलाय. या घरावर तुम्हाला 'व्ह्यू फाइन्डर' आणि 'लेन्स'च्या आकारातील खिडक्याही दिसतील. सोबतच फिल्म स्ट्रिप, फ्लॅश आणि मेमरी कार्डही तुम्हाला या घरावर कोरण्यात आल्याचं दिसेल. रवि होंगल 1986 पासून फोटोग्राफी करत आहेत. आपलं जुनं घर विकून आणि काही पैसे उधार घेऊन त्यांनी आपलं अनोख्या घराचं स्वप्न पूर्ण केलंय. बाहेरून हे घर कॅमेऱ्याप्रमाणे दिसतंच परंतु, घराच्या आतलं इंटिरिअर डेकोरेशन आणि लायटिंगही भव्य आहे. त्यामुळे हे घर अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतंय. सध्या सोशल मीडियावर देखील या घराचं कौतुक होतंय.

Camera

Camera

कॅमेऱ्याच्या दुनियेतील सफर खूपच अल्हाददायक

रवीच्या पत्नी कृपा सांगतात, 'आमचं स्वप्न साकार झालं' या कॅमेऱ्याच्या दुनियेत राहताना आपण कुठेतरी वेगळ्याच विश्वात राहत असल्याचा भास होतोय आणि हे खूपच अल्हाददायक वाटतंय. या कॅमेऱ्याच्या आत राहणं आमच्यासाठी खूपचं सुखद अनुभव आहे. आणि या सुखद क्षणाचा आनंद दिल्याबद्दल मला माझ्या पतीचा गर्व देखील आहे. त्यांच्या नजरेतून साकारलेली ही अनोखी वास्तू माझ्या कुटुंबीयांसाठी मोठं गिफ्ट असल्याचं त्या आवर्जुन सांगतात. बाहेरून पाहिल्यावर या घराचा अनोखा कॅमेरा आकार, आतील भव्य सजावट, लाईटिंग ही रोषणाई घराला आणखी आकर्षक करत असल्याचेही त्या सांगतात.

पुस्तकांसाठी घर बांधणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल 'या' गोष्टी माहित आहेत? मग, जाणून घ्याच..

loading image
go to top