जिद्द ठेवल्यानेच कोरोना आणि अर्धांगवायूवर मात करु शकलाे : दिलीप निकम

जिद्द ठेवल्यानेच कोरोना आणि अर्धांगवायूवर मात करु शकलाे : दिलीप निकम

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : 12 ऑगस्टला मला कोरोनाच्या उपचारासाठी बेड मिळाला. पहिले दोन ते तीन दिवस शरीरातील ऑक्‍सिजन लेव्हल मेंटेन करण्याची ट्रीटमेंट सुरू झाली. नंतर रेमडिसिव्हर इंजेक्‍शन सलाईनद्वारे सुरू करण्यात आली. पहिल्याच इंजेक्‍शननंतर मला रिऍक्‍शन आली आणि माझ्या शरीराची एक बाजू चालेनाशी झाली. एका बाजूला कोरोनाचा संसर्ग व दुसऱ्या बाजूला अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे मी चांगलाच घाबरलो. पण, जगण्याची इच्छा तीव्र होती. अर्धांगवायू व कोरोनाच्या त्रासाने पुढील आयुष्य कसे जगायचे, या विवंचनेत माझ्या मनात मृत्यू जवळ येतोय का? असा विचार आला. पण, माझे प्रारब्ध बलवत्तर होते. माझे कुटुंबीय व मित्र आत्मबळ वाढवणारे असल्याने मी कोरोना आणि अर्धांगवायूला एकाचवेळी हरवू शकलो असे शेरे (ता. क-हाड) येथील संगणक अभियंता दिलीप निकम यांनी नमूद केले. 

निकम म्हणाले, पिंपरी-चिंचवडमध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरुवातीस तापाचा त्रास झाला. लगेचच खोकला आल्यानंतर जवळच्या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये गेलो. तेथे डॉक्‍टरांनी माझी तपासणी केली. कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने डॉक्‍टरांनी मला कोरोनाची तपासणी करण्यास सांगितले. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मला नगरसेवक विशाल खंडेलवाल यांच्या मदतीने देहूरोडवरील संत तुकाराम हॉस्पिटलला बेड मिळाला. तेथे दोन दिवस ऑक्‍सिजन लेव्हलचे उपचार सुरू केले. त्यानंतर रेमडिसिव्हरची इंजेक्‍शन सुरू करण्यात आली. पहिल्याच इंजेक्‍शनची रिऍक्‍शन आली आणि मला अर्धांगवायूचा झटका आल्याने शरीराची एक बाजू चालेनासी झाली. हॉस्पिटल छोटे होते. यामुळे मी सहकारी प्रदीप निकम यांना दुसऱ्या हॉस्पिटलला शिप्ट करण्याची विनंती केली. मग मला पिंपरीतील स्टर्लिंग हॉस्पिटलला बेड मिळाला. तेथे डॉक्‍टरांनी पूर्ण काळजीपूर्वक उपचार सुरू केले. एमआरआयच्या रिपोर्टनुसार अर्धांगवायूपेक्षा कोरोनावरील उपचार महत्त्वाचे मानून त्यांनी पुन्हा कोरोनाचे उपचार सुरू केले. सहा दिवसांत मला औषधोपचार व जेवण या सुविधा चांगल्या पद्धतीने मिळाल्या.

सकारात्मक विचार असेल, तर कोरोनाला हरवणे कठीण नाही : गिरीष शहा

बेडवर असताना मला अंगाच्या एका बाजूची हालचाल होत नसल्याने हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांची मदत लागायची. एका बाजूने बोलताही येत नसल्याने बेडवरून सूचना करूनही सेवा मिळताना खंड पडायचा. यावेळी जवळच्या बेडवरील रुग्णाने मला खूप धीर दिला. त्यांनी मला स्वतःहून जागेवरून हलण्यास मदत केली. आपण या दोन्ही संकटांतून बाहेर पडायचे, ही जिद्द असल्याने मी स्वतः हालचाली सुरू केल्या. हळूहळू मी स्वतःहून माझी सेवा करू लागलो.

सातारा जिल्ह्यातील बेडची माहिती आता एका क्लिकवर..

सहा दिवसांनंतर मला स्टर्लिंगमधून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर होम आयसोलेशन घरी केले. त्यानंतर मी पूर्णतः या आजारातून बाहेर पडलो. त्यानंतर मी कऱ्हाडमधील न्यूरॉलॉजिस्ट डॉ. बोत्रे यांच्याकडे अर्धांगवायूचे उपचार घेतले. नागरमनोल्ली येथील उपचारही घेतले. आता मी अर्धांगवायूमधून 95 टक्के कव्हर झालेलो आहे. मी ऑफिस कामही वर्क फ्राॅम होम व ऑफिसमधून स्वतः जाऊन करतोय. लॅपटॉप स्वतः चालवतो. माझे कुटुंबीय व मित्रांच्या पाठबळामुळे या दोन्ही आजारांना हरवू शकलो. 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com