esakal | मंदिरे, धार्मिक स्थळे गुरुवारपासून उघडणार; पुजाऱ्यांना करावी लागणार 'चाचणी' I Coronavirus
sakal

बोलून बातमी शोधा

Temples

कोरोनाच्या महामारीचा जिल्ह्यातील जनता १७ महिन्यांपासून सामना करत आहे.

मंदिरे, धार्मिक स्थळे गुरुवारपासून उघडणार

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कोरोनाच्या (Coronavirus) महामारीमुळे गेली १७ महिने बंद असलेली जिल्ह्यातील सर्व प्रकारची मंदिरे (Temples), धार्मिक व प्रार्थनास्थळे कोरोनाची मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत येत्या सात ऑक्टोबरपासून उघडण्यास जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी परवानगी दिली आहे. मंदिरे खुली ठेवण्याच्या वेळा विश्‍वस्त मंडळ, अधिकारी यांनी ठरवायच्या आहेत, असेही आदेशात म्हटले आहे. मंदिराच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता सामाजिक अंतराच्या अटीचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

हेही वाचा: 'त्यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी निवडणुकीला सामोरं जावं'

कोरोनाच्या महामारीचा जिल्ह्यातील जनता १७ महिन्यांपासून सामना करत आहे. संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन केल्यामुळे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे गर्दी होणाऱ्या ठिकाणांमध्ये मंदिरांचा समावेश असल्याने ही मंदिरेही बंद ठेवण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने लॉकडाउन शिथिल झाल्याने हळूहळू सर्व जनजीवन पूर्वपदावर आले आहे. सर्व व्यवहार पूर्णपणे सुरू करण्यात आले; पण मंदिरे सुरू करण्यात आली नव्हती. अखेर आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश जारी करून येत्या सात ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिरे खुली केली असली तरी येथे होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिरांच्या वेळा निश्चित करण्याची जबाबदारी विश्वस्त मंडळ, तसेच अधिकाऱ्यांनी घ्यायची आहे.

हेही वाचा: भाजपच्या राजेंविरोधात राष्ट्रवादी मैदानात

मंदिरात प्रवेश करताना मास्क, सोशल डिस्टसिंगचे पालन आवश्यक केले आहे. सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्रातील (कंटेनमेंट झोन) मंदिरे उघडण्यास मात्र, परवानगी नसेल. ६५ वर्षांवरील व्यक्ती व लहान मुलांनी मात्र, घरीच राहायचे आहे. मंदिरांच्या ठिकाणी येणारे नागरिक, कामगार, भाविक, सेवेकरी यांच्या आरोग्याचे निरीक्षण करणे, तसेच आजारी असल्यास स्थानिक प्रशासनास कळविण्याची जबाबदारी ही मंदिराच्या व्यवस्थापनाची असेल. मंदिरांच्या प्रवेशद्वारात हाताला लावण्यासाठी सॅनिटायझरची सोय करावी, तसेच येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्क्रिनिंगची सोय करायची आहे. धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी केवळ लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल. मंदिरातील पवित्र पुस्तके, मूर्ती, पुतळे यांना स्पर्श करण्याची परवानगी नसेल. प्रार्थनास्थळी एकत्र येत एकच चटई वापरण्यास परवानगी नाही, तसेच प्रसाद वाटप व पवित्र पाणी शिंपडण्यासही परवानगी दिलेली नाही.

हेही वाचा: 130 फूट उंचीच्या सुळक्यावर 30 वर्षांपासून एकट्याचे वास्तव्य; पाहा PHOTO

पुजाऱ्यांना चाचणी करावी लागणार

प्रत्येक धार्मिक, प्रार्थना स्थळाच्या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या, जागा आणि सामाजिक अंतराचा प्रोटोकॉल पाळला जाईल. याबाबत संबंधितांनी पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना हमीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आठवड्यातून एकदा कोरोना चाचणी करावी लागणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे.

loading image
go to top