esakal | Corona Impact : साताऱ्यात सोमवारपासून Lockdown शिथिल; सर्व दुकाने होणार सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

Weekend lockdown

कोरोना संसर्गाचा रेट कमी होऊ लागल्याने जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश झाला आहे. परिणामी, जिल्हा प्रशासनाने येत्या सोमवारपासून लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Corona Impact : साताऱ्यात सोमवारपासून Lockdown शिथिल

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कोरोना संसर्गाचा (Coronavirus) रेट कमी होऊ लागल्याने जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश झाला आहे. परिणामी, जिल्हा प्रशासनाने येत्या सोमवारपासून लॉकडाउन (Lockdown) शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यकसह इतर दुकाने वेळेच्या बंधनात सुरु करण्यास परवानगी दिली आहे. पण, शनिवार व रविवार असे दोन दिवस वीकेंड लॉकडाउन (Weekend lockdown) असल्याने याबाबतचे आदेश रविवारी निघणार आहेत. त्यामुळे सातारकरांची सोमवारपासून लॉकडाउनमधून सुटका होणार आहे. (Coronavirus Impact Lockdown Restrictions In Satara District Will Be Reduced From Monday bam92)

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. त्यानुसार मागील आठ दिवसांचा पॉझिटिव्हीटी रेट आज कोरोना आढावा बैठकीत तपासण्यात आला. त्यानुसार जिल्ह्याचा आता तिसऱ्या टप्प्यात समावेश झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील सर्व नियमावली जिल्ह्याला लागू होणार आहे. यामध्ये अत्यावश्यक दुकानांसह इतर दुकानेही सोमवारपासून उघडली जातील. यासंदर्भात आज विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar) व पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Guardian Minister Balasaheb Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकप्रतिनिधींची बैठक झाली. यामध्ये सर्वसमावेशक चर्चा होतानाच जनतेच्या व व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करण्यात आला.

हेही वाचा: 'महाराष्ट्रात लवकरच सत्ताबदल; राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार'

तसेच जिल्ह्यातील कमी होत असलेली कोरोनाची परिस्थिती ही लक्षात घेऊन सर्वानुमते लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय घेतला. पण, आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी सर्वांनी सज्ज राहण्याची सूचनाही रामराजे व बाळासाहेब पाटील यांनी केली आहे. आता सोमवारपासून अत्यावश्यक सेवेत समाविष्ट सर्व दुकानांसह इतर सर्व दुकाने वेळेच्या बंधनात सुरु होणार आहेत. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी जनतेने कोरोना नियमावलीचे पालन करावे, गर्दी टाळावी, मास्क तसेच सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोना संदर्भातील काही लक्षणे आढळल्यास संबंधितांनी तातडीने चाचणी करुन घेऊन विलगीकरण कक्षात जावे, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली आहे.

Coronavirus Impact Lockdown Restrictions In Satara District Will Be Reduced From Monday bam92

loading image