जन्म-मृत्यू विभागाचे कामकाज बंद; सातारा पालिकेचे 'हे' विभाग सुरु!

बाळकृष्ण मधाळे
Tuesday, 15 September 2020

जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असताना आता शासकीय कार्यालयांमध्ये देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नगरपालिका याठिकाणी  कोरोना प्रतिबंधाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण होत आहे. सातारा पालिकेतील कोरोना विभागापाठोपाठ आरोग्य, जन्म-मृत्यू, पाणीपुरवठा व शहर विकास विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

सातारा : जिल्ह्यात कोरोना महामारीने थैमान माजवले आहे. ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने अनेकांचा मृत्यू होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. आजपासून जिल्ह्यात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम सुरू होत असून यामध्ये घराघरात जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे प्रबोधन करताना रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येणार आहेत. ही मोहीम कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल,  असा प्रशासनाचा दावा आहे. 

सातारा पालिकेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने शुक्रवारपासून बंद असलेले पालिकेचे कामकाज सोमवारी पुन्हा एकदा सुरू झाले. जन्म-मृत्यू वगळता इतर सर्व विभाग नेहमीप्रमाणे सुरु होते. कामकाजाचा पहिलाच दिवस असला तरी नागरिकांनी मात्र पालिकेकडे पाठ फिरवली.

राजं, आम्हाला काय बी नग.. फकस्त त्या पायरीवर आमचं नाव कोरण्याची अनुमती द्या!

जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असताना आता शासकीय कार्यालयांमध्ये देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नगरपालिका याठिकाणी  कोरोना प्रतिबंधाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण होत आहे. सातारा पालिकेतील कोरोना विभागापाठोपाठ आरोग्य, जन्म-मृत्यू, पाणीपुरवठा व शहर विकास विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जन्म-मृत्यू विभागाचे कामकाज सलग चौदा दिवस बंद ठेवण्यात आले आहे.

'महानंद' ने घेतली राज्यातील दूधाची जबाबदारी; 97 कोटींचा निधी मंजूर 

दरम्यान, कर्मचारी, अधिकारी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेचे कामकाज शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार पालिकेचा कोरोना विभाग वगळता इतर सर्व विभाग बंद होते. सोमवारी जन्म-मृत्यू वगळता सर्व विभाग पुन्हा सुरु झाले. तत्पूर्वी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून इमारत निर्जंतुक करण्यात आली. जुन्या प्रवेशद्वारातून एकाही नागरिकाला पालिकेत सोडण्यात आले नाही. 

ढेबेवाडी परिसरातील डोंगररांगांत फुलांचे रंगीबेरंगी गालीचे 

कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांनी मुख्य प्रवेशद्वारातून यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पालिकेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची नोंद प्रशासनाकडून ठेवली जात आहे. पालिकेत कामासाठी येताना नागरिकांनी मास्क वापरावा, तसेच सॅनिटायझरचाही वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Infection In Satara Municipal Corporation Employees Satara News