esakal | कऱ्हाडचा बहुचर्चित अर्थसंकल्पाचा 'फेर अहवाल' जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर
sakal

बोलून बातमी शोधा

कऱ्हाडच्या अर्थसंकल्पाचा 'फेर अहवाल' जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर

कऱ्हाडच्या अर्थसंकल्पाचा 'फेर अहवाल' जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर

sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (सातारा) : चार महिन्यापासून बहुचर्चीत प्रलंबीत पालिकेचा अर्थसंकल्पीय फेर अहवाल मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी अखेर आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे सादर केला. दोन दिवसात त्यावर निर्णय अपेक्षीत आहे. अर्थसंकल्पावरून जनशक्ती व नगराध्यक्षांच्या गटात जोरदार आरोप झाले होते. त्यावर निर्णय होत नसल्याने जनशक्तीच्या नगरसवेकांनी लाक्षणीक उपोषणही केले होते. त्याची दखल घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी फेर अर्थसंकल्प सादर करण्याची सुचना केली होती. त्यानुसार आज फेर अर्थसंल्पाची अहवाल आज सादर झाला. municipal-corporation-budget-revision-report-presented-by-ramakant-dake-to district-collector-shekhar-singh-satara-news

पालिकेच्या अर्थसंकल्पाची बैठक फेब्रुवारीत झाली होती. त्यानुसार नगराध्यक्षांनी तो मंजूर केला होता. मात्र कोणता अर्थसंकल्प मंजूर झाला, यावरून नगराध्यक्षा रोहणी शिंदे व जनशक्ती आघाडीचे नेते राजेंद्र यादव, त्यांच्या सहकाऱ्यात वाद होता. नगराध्यक्षांसह भाजपच्या गटात अर्थसंकल्पाची सुचना मंजूर झाली आहे, असे जाहीर केले होते. त्यावर हरकत घेत जनशक्तीचे नेते यादव यांनी अर्थसंकल्पाची सुचना फेटाळून त्यांनी मांडलेली उपसुचना मंजूर झाल्याचा दावा केला होता. त्या दावा प्रतीदाव्यात अर्थसंकल्प पालिकेतच पडून होता.

नगराध्यक्षांच्या गटाने त्यांची सुचना तर जनशक्तीने त्यांची उपसूचना मंजूर करण्याची मागणी केली होती. त्यावर मुख्याधिकारी यांचा स्वंयस्पष्ट अहवालही येथेच होते. त्यानंतर तब्बल चार महिन्याने नगराध्यक्षांनी त्याचा ठराव दिला. त्यावरही जनशक्तीने हरकत नोंदवत खोटी माहिती दिल्याचा आरोप करत उपोषण केले होते. त्यावर जिल्हाधिकारी सिंह यांनी अर्थसंकल्पाचा फेर अहवाल देण्याची सुचना मुख्याधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार पालिकेत चार दिवस त्याचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू होते.

मुख्याधिकारी डाके यांनी अखेर त्यांचा अर्थसंकल्पाचा फेर अहवाल सादर केला. त्याबाबत डाके म्हणाले, मुळ सूचनेत बदल करून उपसुचना गृहीत धरून भाजपसहीत जनशक्तीच्या यादव व लोकशाहीचे आघाडीचे म्हणण्यानुसार अर्थसंकल्प सादर केला आहे. तो तब्बल 270 कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे अर्थसंकल्प लवकरच मंजूर होईल. जनशक्ती आघाडीने अर्थसंकल्पासाठी नऊ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. त्यापूर्वीच अर्थसंकल्प मंजूर होईल. जिल्हाधिकारी सिंह यांनी त्याबाबतच्या सक्त सुचना संबधीतांना दिल्या आहेत. त्यामुळे त्यात काही अडचण वाटत नाही.

हेही वाचा- अन्यथा दुकानदारांसह रस्त्यावर उतरणार; राजू शेट्टींचा इशारा

मुळ सुचनेमध्ये बदल करून उपसूचना गृहीत धरून अर्थसंकल्पाचा पेर अहवाल आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे सादर केला आहे. त्यावर दोन दिवसात निश्चीत योग्य त्या पद्धतीने मंजूरी मिळणार आहे. अर्थसंकल्प वाढीव होणार आहे. मात्र निश्चीत किती वाढीला मंजुरी मिळणार तेही लवकरच कळेल.

रमाकांत डाके, मुख्याधिकारी, कऱ्हाड

loading image