कलेक्‍टरसाहेब, माणसे वाचवा... साता-यात साेमवारी मूकमाेर्चा!

कलेक्‍टरसाहेब, माणसे वाचवा... साता-यात साेमवारी मूकमाेर्चा!

सातारा : सातारा जिल्ह्यात काेराेनाबाधितांना बेड उपलब्ध हाेत नाहीत. रेमडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध हाेत नाही. सर्वसामान्यांची हाेरपळ सुरु आहे. या परिस्थितीत सातारा जिल्हा प्रशासनाकडून आणि त्यांच्या हेल्पलाईनवर काेणतीच माहिती उपलब्ध नसल्याने सातारकरांचा संयम तुटला आहे. परिणामी येत्या सोमवारी (ता. 29) सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व सामाजिक संघटना, बिगर राजकीय संघटना आणि सर्व पक्षीय असा भव्य मुक मोर्चा सामाजिक अंतर राखून काढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना नगरसेवक अमोल मोहिते यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात माेहिते यांनी सातारा जिल्हावासियांच्या भावना मांडल्या आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. बाधितांच्या आणि मृत्यूचा यापैकी एकही आकडा कमी होत नाहीये. दररोज तो वाढतच आहे. कोरोनाचे सातारा जिल्ह्यातील सारे आलेख चढतेच आहेत. ही बाब गंभीर आहे. असे असतानाही जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही साताराकरांच्या पालकत्वाची भूमिका घेणे सर्वसामान्य सातारकरांना अपेक्षित होते. वास्तविक कोरोना महामारीत तुमच्याबरोबरच संपूर्ण जिल्हा प्रशासनाने जबाबदारीने कर्तव्याची भूमिका पार पाडायला हवी होती. ज्या अत्यावश्‍यक उपाययोजना होत्या त्याची अंमलबजावणी करायलाच हवी होती. मात्र तसे कुठेच झालेले दिसत नाही. त्यामुळे कलेक्‍टरसाहेब.... भूमिका बदला आणि माणसे वाचवा..." असे तुम्हाला सांगण्याची वेळ सातरकरांवर आली आहे.

ऑक्‍सिजन बेडसाठी रुग्णांचा संघर्ष; धाप लागून बेततेय जिवावर

सातारा जिल्हातील कोरोनाबाधितांची संख्या जवळपास 31 हजारांच्या पुढे गेला आहे. मृत्यूचा आकडा आता हजारांच्या समीप जाईल. जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना भारतातही सातत्याने वाढणार असल्याचे आरोग्य क्षेत्रातील जाणकार सांगत होते. सातारा हा भारतातच आहे. ही बाब लक्षात ठेवून जर काम सुरू केले असते तर साताऱ्यावर ही वेळ आली नसती. आज साताऱ्यात काय अवस्था आहे, याची कल्पनाच करवत नाही. सामान्य साताराकर, सातारा पालिकेतील जबाबदार लोकसेवक आणि एक कोरोनाबाधित म्हणून मलाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. आजही तेच प्रश्न कायम आहेत. साताऱ्यात बाधितांची संख्या वाढत असताना जिल्हा प्रशासन नेमके काय करत होते, त्याचा उलगडा आजही झाला नाही. सातारकर संयमी आहे, म्हणून प्रशासन जर काहीच हालचाल करत नसेल तर सातारकरांना 'क्रांतिकारी बाणा' दाखवावा लागेल, साताऱ्यात दररोज सातशे ते नऊशेंच्या दरम्यान रूग्ण वाढत आहेत. त्यांना बेड उपलब्ध नाहीत तर ऑक्‍सिजनची बेड आणि व्हेंटिलेटर हा लांबचा विषय आहे. जिल्ह्यात एकुण किती बेड आहेत आणि त्याची उपलब्धता कुठे होईल, याची एकही माहिती आपल्याला 1077 या हेल्पलाईनकडे नाही. त्याबाबत विचारणा केली तर जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हांला आपण कोणतीही माहिती माझ्या परवानगी शिवाय देवू नका, असं सांगितल्याचा दावा करतात.

Dont Worry! रक्ताचं मुबलक प्रमाण, वाचणार अनेकांचे प्राण!

सातारा जिल्ह्यात किती रेमडिसीव्हर इंजेक्‍शन उपलब्ध आहेत आणि ती मिळविण्यासाठीची प्रक्रिया काय आहे, याचीही माहिती मिळत नाही. इंजेक्‍शन मिळविण्यासाठी कोरोना बाधितांच्या नातेवाईकांना ज्या यातना सहन कराव्या लागत आहेत. त्या विषयी चर्चा न केलेली बरी, अशी परिस्थिती आहे. सामाजिक कार्यकर्त आणि माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते तर या इंजेक्‍शनचा काळाबाजार होत असल्याचा दावा करत आहेत. याबरोबरच नगरसेवक अमोल मोहिते यांनी जिल्हा प्रशासनास सहा मुद्यांवर प्रश्‍न विचारले आहेत. यामध्ये साताऱ्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना लाकडाऊनच्या काळात जिल्हा प्रशासनाने कोरोना रोखण्याच्या अनुषंगाने नेमक्‍या काय उपाययोजना आखल्या, जिल्हात कोरोनाबाधितांना बेड उपलब्ध होत नाहीत, असे सांगितले जाते त्यामुळे जिल्ह्यात किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती आपल्याकडून रोजच्या रोज प्रसिध्द करायला हवी. जम्बो कोविड हॉस्पिटल उभारण्याचे काम सुरू आहे. लवकरच ते कार्यान्वीत करणार असल्याचे प्रशासन सांगत आहे. मात्र, ते पूर्ण कधी होणार आणि त्यामध्ये आता अडचणी काय आहेत. याविषयी कोणी बोलत नाही, ज्या कारोनाबाधितांना बेड़ मिळाला आहे. त्यांना रेमडिसीव्हर इंजेक्‍शन उपलब्ध होत नाहीत याची उपलब्धता करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांची फरफट होते. असे का घडते. यावरही कोणीतरी बोलले पाहिजे. कोरोनाबाधित गर्भवती महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यांना बेड मिळत नसल्यामुळे त्यांची फरफट होत आहे. जिल्हा रूग्णालयात जागा मिळालीतर खाली गादी टाकून त्यांची व्यवस्था केली जात आहे. यामुळे गर्भवती महिलांचे मानसिक आरोग्य धोक्‍यात आले आहे. सामान्य नागरिक आणि जबाबदार लोकप्रतिनीधी म्हणून आम्ही करायचे तरी काय याचे उत्तर आता तुम्हीच द्या. आम्ही आता तुमच्याच उत्तराची प्रतीक्षा करत आहे.

साता-याचं वातावरण एकदम कुल, चला शहर बनवूया कलरफुल!

आमच्या या मागण्यांबाबत विचार करावा, अशी आमची मागणी आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने आता आमच्यासमोर काही पर्याय ठेवलेला नाही. कलेक्‍टरसाहेब... शासकीय विभागातील प्रत्येक यंत्रणांनी त्यांच्यासाठी राखीव बेडची तजवीज केली आहे, असे सांगितले जाते. अहो, मग आमच्यासारख्या सर्वसामान्य साताराकरांनी मरुन जायचं का ? आम्हांला जगण्याचा अधिकार आहे की नाही का फक्त अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी जगायचे आणि गोरगरीब जनता, शेतकऱ्यांनी मरायचे ? काहीतरी बोलावे लागेल आणि तुम्हांला ठाम भूमिका घेवून कार्यपध्दती बदलावी लागेल.तुम्ही आता सातारकरांचा अंत पाहू नका सातारकरानी संयम दाखविला. आता हा संयम तुटत चालला आहे. सातारकरांची परीक्षा तुम्ही काही घेवू नका कारण आता जनआंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळावीत आणि जिल्हा प्रशासनाने वारंवार कायद्यावर बोट न ठेवता माणुसकी आणि भावनिकेच्या बाजूनेही विचार करावा, अशी आमची मागणी आहे. यावर का सकारात्मक विचार नाही केला तर आम्ही येत्या सोमवारी (ता.29) सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व सामाजिक संघटना, बिगर राजकीय संघटना आणि सर्व पक्षीय असा भव्य मूक मोर्चा सामाजिक अंतर राखून काढणार आहे असा इशाराही मोहित यांनी दिला आहे. 

कोरेगाव पोलिसांचा फार्म हाऊसवर छापा; पनवेलचे चार अटकेत

आम्ही 'मुक मोचा ' काढणार आहे अथवा काढला म्हणून तुम्ही आमच्यावर व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हें ही दाखल कराल, त्यालाही आता आमची काही हरकत नसणार आहे. आता सातारकरांसाठी एक पाऊल उचलललेच आहे तर माघार घ्याचीच नाही. 'सातारी बाणा ' काय असतो; याची झलक स्वातंत्रलढ्यात इंग्रज सरकारने पाहिलेली आहे. कोरोना महामारीत सातारकर खूप सहन करता आहेत आणि त्याची दखलही कोणी घेत नाही. आमच्य प्रश्नांची उत्तरे नाही मिळाली आणि साताराकरांना जर असा त्रास होत असेलतर आम्ही मूक मोर्चा काढणारच आहे. त्यामुळे कलेक्‍टरसाहेब तुमची आणि तुमच्या हाताखालची अधिकारी, प्रशासन, प्रमुख विभागाची सातारकरविरोधी भुमिका बदला आणि सातरकरांना वाचवा,' हि आमची हात जोडून विनंती आहे असे ही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आम्ही करून दाखवलं; मराठा आरक्षणाबाबत फडणवीसांनीच केला थातूर मातूरपणा : पृथ्वीराज चव्हाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com