Minister Shivendrasinhraje Bhosale
सातारा : राज्यात आपलं सरकार आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी साताऱ्याला भरभरून दिले आहे. आगामी काळातही सातारा पालिकेला जास्तीतजास्त निधी मिळू शकेल. केवळ बिल काढण्यासाठी नगरसेवक नसावा. आपला सातारा, साताराच राहावा. त्याचे सिंगापूर करायची काही गरज नाही, आपला सातारा आहे तो चांगला करूया, असे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.