esakal | सातारा पालिकेतील टेंडर प्रक्रियेत 'गोलमाल'; 'नगरविकास'च्या कदमांची तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Municipality

पूनम कन्‍स्‍ट्रक्‍शन या ठेकेदाराने कमी दराची निविदा भरली होती. यानुसार त्‍या ठेकेदारास रस्‍त्‍यांचे काम देण्‍यात आले.

सातारा पालिकेतील टेंडर प्रक्रियेत 'गोलमाल'

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : सातारा पालिकेच्‍या (Satara Municipality) वतीने काढण्‍यात आलेल्‍या निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्‍या ठेकेदारावर नियमबाह्य पद्धतीने कारवाई करत चढ्या दराने त्‍याच कामांचा ठेका मर्जीतील ठेकेदारास दिल्‍याचा आरोप नगरविकास आघाडीचे (Nagarvikas Aghadi) नगरसेवक अविनाश कदम (Corporator Avinash Kadam) यांनी केला आहे. याबाबतचे निवेदन कदम यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांच्‍यासह जिल्‍हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांना दिले आहे. (Corruption In The Tender Process In Satara Municipality Satara Political News)

सातारा पालिकेने शहरांतर्गत रस्‍त्‍यांच्‍या कामांची निविदा प्रसिद्ध केली होती. या प्रक्रियेदरम्‍यान पूनम कन्‍स्‍ट्रक्‍शन (Poonam Construction) या ठेकेदाराने कमी दराची निविदा भरली होती. यानुसार त्‍या ठेकेदारास रस्‍त्‍यांचे काम देण्‍यात आले. यानंतर काही दिवसांनी त्‍या ठेकेदाराने दरवाढी मागणी लेखीपत्राद्वारे पालिकेकडे केली. या पत्रानंतर मुख्‍याधिकारी अभिजित बापट (Chief Officer Abhijit Bapat) यांनी ती निविदा रद्द करत ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्‍याची प्रक्रिया सुरू केली. याची माहिती मिळाल्‍यानंतर पूनम कन्स्ट्रक्शनने पूर्वीच्‍याच दराने काम करण्‍यास तयार असल्‍याचे पत्र पालिकेस दिले. या पत्रावर म्‍हणणे ऐकून न घेता इतर विषयांचा आधार घेत त्‍या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्‍याबरोबरच त्‍या कामांची फेरनिविदा काढली.

हेही वाचा: 'ठरावाचं अवमूल्यन करणाऱ्या नगराध्यक्षांविरोधात कारवाई करा'

वास्‍तविक तो ठेकेदार कमी दराने काम करण्‍यास तयार असतानाही त्‍याला काळ्या यादीत टाकत मर्जीतील ठेकेदारास काम देण्‍याचा प्रयत्‍न घाईगडबडीत अधिकाऱ्यांनी केल्‍याचा आरोपही कदम यांनी पत्रकात केला आहे. याच काळात तशाच पद्धतीने एका ठेकेदाराने कमी दरात काम करण्‍यास असमर्थता दर्शविली होती. त्‍यावर कारवाई न करता त्‍याला अभय देण्‍यात आले आहे. चढ्या दराने काम करणाऱ्या ठेकेदारांना अभय आणि कमी दराने काम करणाऱ्यांना काळ्या यादीत टाकण्‍याचा हा प्रकार संशयास्‍पद असून, त्‍याची सखोल चौकशी करण्‍याची, तसेच ही निविदा प्रक्रिया स्‍थगित करण्‍याची मागणीही कदम यांनी निवेदनात केली आहे.

Corruption In The Tender Process In Satara Municipality Satara Political News

loading image