
महाबळेश्वर : व्यसन हे दबक्या पावलांनी आयुष्यात येऊन नंतर व्यसनाच्या दुष्टचक्रात माणूस अडकतो. व्यसनाच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी इच्छाशक्तीबरोबर समुपदेशन आवश्यक आहे, असे मत परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेचे प्रकल्प अधिकारी आणि व्यसनमुक्ती तज्ज्ञ किशोर काळोखे यांनी व्यक्त केले.