

Political leaders and ZP members during a meeting amid the race for Satara Zilla Parishad President post.
sakal
सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडीच्या विशेष सभेसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने २० मार्च ही मुदत दिल्याने राजकीय हालचालींना वेग येणार आहे. सातारा जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत कुठल्याच पक्षाकडे नसल्याने झेडपीची सत्ता राष्ट्रवादी, शिवसेना हे दोन पक्ष स्थापन करणार की महायुती म्हणून सत्तेत तीनही पक्ष सहभागी होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.