
कास : नवीन महाबळेश्वर प्रकल्पात विभागातील शेतकरी अल्पभूधारक असून, या शेतकऱ्यांच्या जमिनींवर कोणत्याही प्रकारची आरक्षणे टाकू नयेत, तसेच आराखड्यात टाकलेली आरक्षणे रद्द करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या प्रसिद्ध केलेल्या आराखड्यावरील हरकती व सूचनांसंदर्भात आज महाबळेश्वर तालुक्याची सुनावणी तापोळा येथे पार पडली.