court
court sakal media

सातारा : याचिकेमुळे जिल्हा बॅंकेची मतदार यादी लटकली

न्यायालयात सुनावणी होऊन निकाल झाल्यावरच निर्णय
Published on

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध होणार होती. मात्र, खासदार रणजितसिंह निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्या पाणीपुरवठ्यातील ठराव पात्र केल्याबद्दल उच्च न्यायालयात माण तालुक्यातून याचिका दाखल झाल्याने न्यायालयाने सुनावणी होऊन निर्णय होईपर्यंत अंतिम यादी प्रसिद्ध करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे आज बॅंकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होऊ शकली नाही.

court
रत्नागिरी : अत्याधुनिक जलशुद्धीकरणामुळे मिळणार शुद्ध पाणी

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी कच्चा मतदार यादीवर सुनावणी होऊन आमदार जयकुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे पाणीपुरवठ्यातील ठराव जिल्हा बॅंकेने अपात्र यादीत टाकले होते. त्यावर या दोघांनी विभागीय सहनिबंधकांकडे हरकत घेतली होती. त्यावर सुनावणी होऊन सहनिबंधकांनी दोघांचेही हे ठराव पात्र ठरविले होते. त्यामुळे अंतिम मतदार यादी २७ तारखेला प्रसिद्ध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, या दोन्ही पात्र ठरावांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने न्यायालयाने अंतिम मतदार यादी निकाल झाल्याशिवाय प्रसिद्ध करू नये, अशी सूचना केली. त्यामुळे जिल्हा बॅंकेची अंतिम मतदार यादी आता निर्णयानंतरच प्रसिद्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com