Covid 19 : सातारा तालुक्यातील तिघांचा मृत्यू

सिद्धार्थ लाटकर
Monday, 19 October 2020

सातारा जिल्ह्यात एक लाख 72 हजार 213 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 43 हजार 656 नागरिकांना काेराेनाची बाधा झाली. त्यापैकी 36 हजार 582 नागरिकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आजपर्यंत एक हजार 438 नागरिकांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पाच हजार 636 रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेताहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यात गत चाेवीस तासांत 145 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच आठ  कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय उपचार घेत असलेल्या अंबवडे ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, फत्तेपुर ता. सातारा येथील 78 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये शेंदूरजणे ता. वाई येथील 63 वर्षीय पुरुष, वाळवा जि. सांगली येथील 42 वर्षीय पुरुष, रहिमतपूर ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय महिला, व्यंकटपुरा पेठ ता. सातारा येथील 94 वर्षीय पुरुष, कोळेवाडी ता. कराड येथील 57 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

कास : फुले नव्हे, वन्यप्राण्यांना पाहून सातारकरांना हाेताेय आनंद

याबराेबरच उशिरा कळविलेले हिंगणगाव ता. कराड येथील 70 वर्षीय पुरुष अशा एकूण आठ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

CoronaUpdate : क-हाड शहराला दिलासा; साता-याला चिंता

 • घेतलेले एकूण नमुने -- 172213
   
 • एकूण बाधित -- 43656
   
 • घरी सोडण्यात आलेले --36582
   
 • मृत्यू -- 1438
   
 • उपचारार्थ रुग्ण-5636

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 19 Infected Eight Citizens Passes Away Satara News