रुग्णालयात पोचण्यापूर्वीच त्याला मृत्यूने कवटाळले; सातारा जिल्ह्यातील प्रकार

विजय सपकाळ
Sunday, 6 September 2020

बांधकाम कामगारास रिक्षामध्ये आणल्यानंतर लगेच डॉ. विवेक पारेकर, नर्स चव्हाण व कर्मचारी तातडीने रिक्षा जवळ पोहोचले. मात्र, रुग्णालयात येण्यापूर्वीच रुग्ण मयत झाला होता. त्यामुळे त्याची २० ते २५ मिनिटांत कोरोनाची टेस्ट घेतली गेली आणि ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे नियमाप्रमाणे त्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले नाही. त्या मृतदेहाची नियमानुसार सर्व कार्यवाही करून नगरपंचायतीच्या ताब्यात देण्यात आले.

मेढा : झारखंड राज्यातील मूळ रहिवाशी असलेला बांधकाम कामगार शनिवारी सकाळी एका गावांत कामाला सुरूवात करत असताना सकाळी अचानक त्याच्या पोटामध्ये दुखू लागल्याने त्याला संबंधित घरमालक व त्याच्या मित्रांनी मेढा ग्रामीण रुग्णालयात रिक्षाने पोहचविले. मात्र, येथे पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत यादव यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत यादव म्हणाले, बांधकाम कामगार (वय ३९) सोनपुरा पदमहाजीर बाग, झारखंड हा सध्या केडंबे येथे रहायला असून एका ठेकेदाराकडे कामाला होता. ठेकेदारामार्फत तो एका गावांमध्ये कामाला गेला असता, त्यास तेथे पोटात दुःखू लागल्याने रिक्षाने मेढा ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, त्याचा रूग्णालयात येण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.

धोका वाढला! ढेबेवाडीच्या पोलिस ठाण्यालाही कोरोनाचा विळखा

त्या बांधकाम कामगारास रिक्षामध्ये आणल्यानंतर लगेच डॉ. विवेक पारेकर, नर्स चव्हाण व कर्मचारी तातडीने रिक्षा जवळ पोहोचले. मात्र, रुग्णालयात येण्यापूर्वीच रुग्ण मयत झाला होता. त्यामुळे त्याची २० ते २५ मिनिटांत कोरोनाची टेस्ट घेतली गेली आणि ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे नियमाप्रमाणे त्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले नाही. त्या मृतदेहाची नियमानुसार सर्व कार्यवाही करून नगरपंचायतीच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, त्यांनीच त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 19 Patient Died Before Reaching Medha Hospital