सातारकरांनाे! लॉकडाउन टाळणे आपल्याच हाती; अशी घ्या काळजी

प्रवीण जाधव
Monday, 22 February 2021

राज्यातील विविध भागांप्रमाणे जिल्ह्यातही कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. त्याला रोखण्यासाठी राज्य सरकार व प्रशासनाकडून पुन्हा लॉकडाउनच्या हालचाली कराव्या लागतील असे सूचक इशारे दिले जात आहेत.

सातारा : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रमाणामुळे लॉकडाउनच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. लॉकडाउनच्या काळात मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्य व व्यापाऱ्यांच्या मनात त्यामुळे धस्स होत आहे; परंतु अशी परिस्थिती टाळणे सर्वस्वी आपल्याच हातात आहे. त्याचबरोबर प्रशासनानेही ढिलाई सोडून नियमांच्या पालनासाठी कंबर कसणे आवश्‍यक आहे.
 
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर केले. कधी नव्हे ते सर्वांनाच या गोष्टीला सामोर जावे लागले. त्याचा उद्योग व व्यवसायाला मोठा फटका बसला. सर्वांनाच मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोर जावे लागले. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. व्यवसाय कोलमडले. तीन महिन्यानंतर निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात आले, तरीही वेळेची बंधने होतीच. या सर्व परिस्थितीतून सावरत उद्योग व व्यवसाय आता पूर्ववत मार्गावर यायला लागले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेल्याने प्रशासनाचेही काही प्रमाण दुर्लक्ष झाले. नागरिकही आपली जबाबदारी विसरले. त्यामुळे गर्दी वाढत गेली. मास्क, सॅनिटायझरचे पालन करण्यात ढिलाई आली. त्याचा परिणाम साहजिकच कोरोनाचे रुग्ण वाढण्यात होत आहे.

राज्यातील विविध भागांप्रमाणे जिल्ह्यातही कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. त्याला रोखण्यासाठी राज्य सरकार व प्रशासनाकडून पुन्हा लॉकडाउनच्या हालचाली कराव्या लागतील असे सूचक इशारे दिले जात आहेत. पुन्हा लॉकडाउन कोणालाच नको आहे. त्यामुळे सर्वांच्या मनात लॉकडाउनची धास्ती वाढायला लागलेली आहे. पूर्ण लॉकडाउन कदाचित व्हायचे नाही; परंतु पुन्हा काही निर्बंध येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही; परंतु ते टाळण्यासाठी सर्वांनी पूर्वीप्रमाणे नियमांच्या पालनाकडे गंभीरपणे लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. 

काय बंधने येऊ शकतात 

 •  दुकानांच्या रात्रीच्या वेळा व फिरण्यावर मर्यादा 
 •  चित्रपटगृहांवर बसू शकतो अंकुश 
 •  लग्न व सार्वजनिक कार्यक्रमावर संख्यांची मर्यादा 
 •  शाळ व महाविद्यालयांवर बंदी 
 •  दुकानाची वेळ व गर्दीवर मर्यादा 
 •  सांघिक खेळावर येऊ शकते मर्यादा 
 •  

खबरदारी घेणे हाच उपाय 

 •  सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे 
 •  घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे 
 •  सॅनिटायझर व हात धुण्याच्या सवयी काटेकोरपणे पाळणे 
 •  दुकान, मंडई व प्रवासात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे 
 •  ताप- सर्दी- खोकल्याचा त्रास झाल्यास तातडीने कोरोना चाचणी करणे 
 •  वृद्ध व पूर्वीचे आजार असलेल्या लोकांनी घराबाहेर पडणे टाळावे 
 •  

...याकडे हवे प्रशासनाचे लक्ष 

 •  मास्कच्या वापरावर हवे काटेकोर लक्ष 
 •  दुकाने व मंडईतील गर्दीवर कारवाई 
 •  लग्न व अन्य कार्यक्रमांवरील गर्दीवर नियंत्रण 
 •  सर्दी- तापाच्या रुग्णांची शोध मोहीम 
 •  रुग्ण कळविण्याबाबत खासगी डॉक्‍टरांशी समन्वय 
 •  हॉटेलमधील सोशल डिस्टन्सिंगचा अभाव 
 •  राजकीय कार्यक्रमाला दिली जाणारी परवानगी तेथील गर्दीवर होणारे दुर्लक्ष.

सरकारची हुकूमशाही मोडीत काढू; कॉंग्रेस नेत्याची जनेतला साद

सहा विद्यार्थी कोरोनाबाधित; शिक्षक सुखरुप, विद्यालय बंद

अथणी- रयत कारखान्याने एफआरपीपेक्षा दिला जादा दर; शेतकरी समाधानी

अरेच्या! चक्क क्रॉस ग्रेहाऊंड जातीच्या कुत्रीची चोरी

इन्स्टाग्राम वापरताय, या गोष्टी माहिती नसतील तर होईल फसवणूक

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 19 Patients Increased Precautions No Lockdown Satara Marathi News