साताऱ्यात कोरोनाचा कहर; पाच महिन्यांत मृत्यूंमध्ये 66 पटीने वाढ

साताऱ्यात कोरोनाचा कहर; पाच महिन्यांत मृत्यूंमध्ये 66 पटीने वाढ
Updated on

सातारा : एप्रिल महिन्यामध्ये अवघ्या पाचच्या संख्येने कोरोनाबाधितांच्या चिता पेटण्यास जिल्ह्यात झालेली सुरवात थांबण्याचे नाव घेईना. उलट गेल्या महिन्यात या संख्येने उच्चांक गाठलेला आहे. एकट्या ऑगस्ट महिन्यात सातारा व कऱ्हाडमधील स्मशानभूमींमध्ये 330 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यावरून कोरोनाची दाहकता समोर येत आहे. दरम्यान, अंत्यसंस्काराची आकडेवारी पाहता एप्रिलच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यामध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्यांची आकडेवारी 66 पटीने वाढलेली आहे.
भिवा भदाणेचा तेरावा

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात 23 मार्चपासून लॉकडाउन जाहीर  करण्यात आले. अत्यावश्‍यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांवरही शुकशुकाट होता. या कालावधीत देशात व राज्यात कोरोनाचे रुग्ण सापडत असताना जिल्ह्यामध्ये पहिला रुग्ण आढळण्यास एप्रिल उजाडला. तेव्हापासून जिल्ह्यात सुरू झालेली कोरोनाबाधितांची साखळी तुटता तुटेना. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16 हजारांपर्यंत पोचली आहे.

साताऱ्यात 50 कोटींचे जंबो हॉस्पिटल!, मुख्यमंत्र्यासह लोकप्रतिनिधींची भूमिका ठरणार महत्वाची 

त्यातील बहुतांश रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. परंतु, गंभीर रुग्णांना योग्य उपचार पुरविण्यात, त्यांच्या उपचाराची एकंदर यंत्रणा हाताळण्यात प्रशासन अपुरे पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. कोरोनाबाधित मृतांवर सातारा व कऱ्हाड येथील स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्या ठिकाणी गेल्या पाच महिन्यांमध्ये झालेल्या कोरोनाबाधित व संशयितांच्या अंत्यसंस्काराची आकडेवारी कोरोनाबाधितांची गंभीर परिस्थिती टप्प्याटप्प्याने कशी वाढत गेली, ते स्पष्ट करत आहे. त्यातच एका महिन्यात कोरोना किती भयानक परिस्थिती आणू शकतो, हेही समोर येत आहे.

तो क्षण पाहण्यासाठी वडील हवे होते
 
अंत्यसंस्काराची आकडेवारी पाहता एप्रिलच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यामध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्यांची आकडेवारी 66 पटीने वाढलेली आहे. एप्रिल महिन्यात कोरोनाबाधित आणि संशयित अशा पाच जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तोच आकडा ऑगस्टमध्ये 330 वर गेलेला आहे. त्यातच वाढीचे हे प्रमाण ऑगस्टमध्येच मोठ्या प्रमाणावर आहे. अवघ्या एक महिन्यात मागील महिन्याच्या तुलनेत 244 मृत्यूंची वाढ झाल्याची गंभीर परिस्थिती समोर येत आहे. जुलैमध्ये 86 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढत आहे.

जावळीतील मार्ली घाटात सांगली जिल्ह्यातील कुटुंबास संपविले; एसपींची घटनास्थळी धाव

दररोज दहा ते 15 जणांचा कोरोनाने मृत्यू होतो आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कारासाठी अनेकदा 24 ते 72 तासांचे वेटिंग करावे लागले आहे. जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. त्यातच सध्या दररोज 600 पेक्षा जास्त कोरोनाबाधित समोर येत आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांची संख्याही वाढत आहे. परंतु, त्यांना उपचारासाठी ऑक्‍सिजन तसेच व्हेंटिलेटरचे बेडही उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे आगामी काळात मृत्यूंची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला विचारला जाब; म्हणाले, तुम्हाला हे बरं चालतं! 


कोरोनाबाधित मृतांचा गोषवारा : 

सातारा अंत्यसंस्कार

एप्रिल 3 

मे 14  

जून 20  

जुलै 56 

ऑगस्ट 204  

जयहिंद फाउंडेशनकडून ग्रामसेवकांचा गौरव 

कऱ्हाड अंत्यसंस्कार 

एप्रिल 2 

मे 6 

जून 14 

जुलै 30 

ऑगस्ट  126 

बरे होण्याचे प्रमाणही चांगले 

जिल्ह्यात आजवर 46 हजार 665 जणांचे स्वॅब तपासले असून, त्यात 15 हजार 960 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यातील आठ हजार 151 रुग्ण उपचाराने बरे झाले असून, सात हजार 366 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आजवर 443 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संपादन : सिद्धार्थ लाटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com