जिल्हाधिकारी साहेब! बगाड यात्रेतील धाेका टाळण्यासाठी बावधनसह वाड्यावस्त्यांवरील प्रत्येकाची काेराेनाची चाचणी करा

जिल्हाधिकारी साहेब! बगाड यात्रेतील धाेका टाळण्यासाठी बावधनसह वाड्यावस्त्यांवरील प्रत्येकाची काेराेनाची चाचणी करा

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने यात्रेवर घातलेले निर्बंध धुडकावून दाेन एप्रिलला "काशिनाथाच्या नावाचं चांगभलं'च्या गजरात आणि सनई वाजंत्रीच्या निनादात बावधन (ता. वाई) येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर आता दहा दिवसांनी बावधन आणि परिसरातील वाड्या वस्त्यांमधील ग्रामस्थांना काेराेनाची बाधा झाल्याचे स्पष्ट हाेत आहे. आजपर्यंत साधारणतः 59 ते 61 ग्रामस्थांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान बाधितांची संख्या थाेपविण्यासाठी बावधन आणि परिसरातील प्रत्येक घरातील ग्रामस्थाची तपासणी करणे आवश्यक बनले आहे. 

सातारा जिल्ह्यात संपूर्णतः संचारबंदी आणि बावधन येथे प्रतिबंधित क्षेत्र असताना ग्रामस्थांनी अत्यंत गोपनियता पाळून बगाड यात्रेची शेकडो वर्षांची परंपरा जपली. यामध्ये सोशल डिस्टन्सचा पूर्णपणे फज्जा उडाला हाेता. गेल्या वर्षी पोलिसांनी बगाड मिरवणूक काढल्याबद्दल यात्रा समितीवर गुन्हा दाखल केला होता. या वर्षी ग्रामसभा न झाल्याने यात्रा समितीच स्थापन करण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे यात्रेचे नियोजन कोण आणि कसे करीत आहे हे कोणालाच समजत नव्हते. त्यानंतर पाेलिस प्रशासनाने सुमारे 2500 जणांवर गुन्हा दाखल केला. त्यापैकी सुमारे 100 लाेकांना पकडले. त्यातील बहुतांश जण जामीनावर सुटले आहेत. 

दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सर्व यात्रा- जत्रांना जिल्हा प्रशासनाने बंदी घालून सुद्धा बावधनची बगाड यात्रा निघाली. यात्रेस माेठी गर्दी झाली. त्याचा परिणाम आता दहा दिवसांनी प्रकर्षाने पुढे येऊ लागला आहे. आजपर्यंत एकूण 77 ग्रामस्थांना काेराेनाची लागण झाली. सध्या बावधन आणि परिसरातील वाड्या वस्त्यांमधील 62 ग्रामस्थांवर काेविड 19 चा उपचार सुरु आहेत. संबंधित ग्रामस्थांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी तपासणी केली. त्यानंतर ग्रामस्थांना काेराेनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

एसपींपासून आयजीपर्यंत सर्व पोलिसांना माझे सांगणे आहे, आम्ही टॅक्‍स भरतो म्हणून तुमचे पगार होतात

बावधनच्या बगाड यात्रेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी काही जण अद्याप पाेलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यातील मुख्य म्हणजे बगाड्याच अद्याप सापडलेला नाही असेही सांगितले जात आहे. दूसरीकडे ग्रामस्थ स्वतःहून पुढे येतील आणि मी यात्रेत हाेताे असेही सांगणार नाहीत. ज्यावेळेस काेणाला त्रास हाेईल त्याच वेळेस ग्रामस्थांना समजणार संबंधितांस काेराेनाची लागण झाली. 

खरंतर आता प्रशासनाने आराेग्य विभागाच्या सहकार्याने तातडीने बावधन आणि परिसरातील वाड्यावस्त्यांवर जाऊन प्रत्येक ग्रामस्थाची तपासणी करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे काेविडचा सुपरस्प्रेड थांबवण्यास मदत हाेणार आहे.

रेमडिसिव्हिर आणा; मगच दाखल व्हा! खासगी रुग्णालयांकडून सक्ती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com