esakal | Video पाहा : विनाकारण फिरताय मग कोविड टेस्ट करा!
sakal

बोलून बातमी शोधा

Covid 19 Test

Video पाहा : विनाकारण फिरताय मग कोविड टेस्ट करा!

sakal_logo
By
जालिंदर सत्रे

पाटण (जि. सातारा) : कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही संचारबंदी काळात मोकाट विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. यावर उपाय म्हणून पाटण तालुका प्रशासनाने आज संयुक्त मोहीम राबवून मोकाट फिराल, तर कोविड टेस्टला सामोरे जाल आणि कोविड सेंटरला भरती व्हाल, असा संदेश दिला. प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच मोकाट फिरणाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. दरम्यान, प्रशासनाच्या या शक्कलमुळे काही वेळातच रस्ते ओस पडले.

कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असल्याने शासनाने संचारबंदी लागू केली आहे. मृत्यूचे प्रमाण वाढत असतानाही कोणी महामारी गांभीर्याने घेत नसल्यामुळे पाटण शहरात नेहमीप्रमाणे वरदळ सुरू होती. यावर रामबाण उपाय शोधताना महसूल, आरोग्य, पंचायत समिती, पोलिस व नगरपंचायत प्रशासनाच्या खातेप्रमुखांनी कऱ्हाड- चिपळूण महामार्गावर पाटणला संयुक्त मोहीम राबविली.

बाजारपेठा बंद असतानाही कारण नसताना मोटारसायकलवरून फिरणाऱ्यांची संख्या वाढली होती. दवाखान्यात जायचे आहे, बॅंकेत काम आहे, भाजीपाला खरेदी करायचा आहे, पाहुना आजारी आहे अशी वेगवेगळी कारणे देऊन पोलिसांना फसविले जात होते. आज अचानक तहसीलदार योगेश्वर टोंपे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांनी नगरपंचायतीच्या समोर जुना बस स्थानक परिसरात धडक मोहीम राबविली.

साताऱ्यात विनाकारण फिरणाऱ्या 200 जणांवर कारवाई; शाहूपुरीतील दोघांवर गुन्हा

या मोहिमेत रुग्णवाहिका व कोविड तपासणीसाठी कर्मचारी तैनात केले होते. विनाकारण फिरणाऱ्यांची कोविड टेस्ट करण्याचा तत्काळ फंडा अवलंबिला आणि मोकाट फिरणारे सैरभैर पळू लागले. एकूण दहा जणांची कोविड टेस्ट जाग्यावर केली व एकास कोविड सेंटरमध्ये भरती करण्यासाठी रुग्णवाहिकेतून नेण्यात आल्याने चांगलीच खळबळ उडाली.

loading image