esakal | साताऱ्यात विनाकारण फिरणाऱ्या 200 जणांवर कारवाई; शाहूपुरीतील दोघांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Police Action

साताऱ्यात विनाकारण फिरणाऱ्या 200 जणांवर कारवाई; शाहूपुरीतील दोघांवर गुन्हा

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : अत्यावश्‍यक नसतानाही सातारा शहरात विनाकारण फिरणाऱ्या 200 जणांवर सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांनी कारवाई करत दंड केला. याचप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करत दिवसभरात चार दुचाक्‍या जप्त केल्या.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनमधून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. या सेवांचा लाभ घेण्याच्या नावाखाली अनेक नागरिक घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत कारवाईचा सपाटा लावला. आज सातारा शहर पोलिसांनी शहराच्या विविध भागांत नाकाबंदी करत येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनधारकांची चौकशी, तपासणी केली. तपासणीत योग्य कारणासाठी ही व्यक्‍ती घराबाहेर पडल्याचे निदर्शनास आल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला सोडून देण्यात येत होते. विनाकारण फिरणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येत होता. सातारा शहरात पोलिसांनी दिवसभरात दोनशेहून अधिक जणांवर कारवाई करत दंड वसूल केला.

'त्या' पैशांची उदयनराजेंना जिल्हाधिकाऱ्यांची मनिऑर्डर

शाहूपुरी पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या चार जणांच्या दुचाक्‍या जप्त केल्या, तर याच प्रकरणी रफीक कादर शेख (रा. शनिवार पेठ, सातारा) आणि स्वप्नील शिवाजी आवारे (रा. गुलमोहर कॉलनी, शाहूपुरी) या दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला. जप्त केलेल्या दुचाक्‍या लॉकडाउन समाप्ती झाल्यानंतर दंडात्मक कारवाईनंतर संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. आदेशाच भंग करत दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी राम जनार्दन साळुंखे (रा. प्रतापगंज पेठ, सातारा) यांच्यावरही शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Edited By : Balkrishna Madhale

loading image