साता-यासह क-हाडात काेविड 19 च्या प्रतिबंधक लसीकरणास पुन्हा प्रारंभ

साता-यासह क-हाडात काेविड 19 च्या प्रतिबंधक लसीकरणास पुन्हा प्रारंभ

सातारा : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना लशीचा साठा संपल्याने लसीकरण मोहीम ठप्प झाली होती. आता पुन्हा जिल्ह्याला 35 हजार लशीचे डोस उपलब्ध झाले आहेत. याबराेबरच रविवारी 39 हजार लशीचे डोस मिळाले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयात लसीकरण मोहीम पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन अद्यापही उपलब्ध नसल्याने रेमडेसिव्हिरच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
 
जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम एक मार्चपासून सुरू झाली. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयासह आरोग्य केंद्रात मोठा प्रतिसाद मिळत होता, तसेच दररोज 20 हजार नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवल्याने अचानक जिल्ह्यातील लशीचा साठा संपल्याचे लसीकरण मोहीम बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांना लस न घेताच माघारी परतावे लागले होते. मात्र, सद्यःस्थितीत लशीचे डोस जिल्ह्याला उपलब्ध झाल्याने लसीकरण मोहीम पूर्ववत सुरू झाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांसाठी आवश्‍यक असणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा जिल्ह्यात तुटवडा भासत असल्याने रुग्णांचा जीव टांगणीला पडला आहे. रेमडेसिव्हिरचा साठा कमी असल्याने कित्येक रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अनेक खासगी ठिकाणी रेमडेसिव्हिरसाठी दुप्पट- तिप्पट दर आकारात रुग्णांच्या नातेवाईकांची लूट केली जात आहे.

Video पाहा : कोणी आहे का? आमचे ऐकायला..., उदयनराजे
 
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले, की जिल्ह्यात 35 हजार लशीचे डोस उपलब्ध झाल्यानंतर 72 प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व जिल्हा रुग्णालयात विभागून लशीचे वाटप केले आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून ठप्प झालेली कोरोना लशीची मोहीम पुन्हा एकदा वेग घेईल. 

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लशीचा साठा संपल्याने लसीकरण मोहीम थांबविण्यात आली होती. मात्र, जिल्ह्याला काल लशीचे डोस उपलब्ध झाल्याने लसीकरण वेगाने सुरू झाले आहे. लसीकरणासाठी ज्या नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे, त्यांनी तत्काळ लस घ्यावी.

बाळासाहेब पाटील, पालकमंत्री 

कराड  शहराससह तालुक्‍यातील कोरोनाची लस दोन दिवसांपासून संपली होती. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. दोन दिवसांनंतर पुन्हा लस उपलब्ध झाली असून, लसीकरणही सुरू करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी आज दिली. 

कोरोनाचे लसीकरण वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य उपकेंद्राध्ये सुरू होते. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसादही मिळत होता. त्याअंतर्गत अनेकांनी लस घेतली आहे. मात्र, शहरासह तालुक्‍यातील लस दोन दिवसांपूर्वी संपली होती. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. जिल्ह्याकडूनच लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. ज्या नागरिकांना लस उपलब्ध नाही याची माहिती नसल्याने त्यांचे विनाकारण हेलपाटे झाले. काही जणांनी वादावादीही घातली. मात्र जिल्ह्याकडून सध्या लस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लसीकरण सुरू झाले आहे असे डॉ. देशमुख यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com