esakal | धक्कादायक! कऱ्हाडात कोरोनाबाधित महिलेच्या मंगळसुत्रावरच चोरट्याचा डल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Gold Stolen

कऱ्हाडातील एका हॉस्पिटलमध्ये कोविडचा उपचार घेणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीस गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

धक्कादायक! कऱ्हाडात कोरोनाबाधित महिलेच्या मंगळसुत्रावरच चोरट्याचा डल्ला

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : कऱ्हाडातील एका हॉस्पिटलमध्ये (Hospital) कोविडचा उपचार घेणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सव्वा दोन तोळ्याचे मंगळसूत्र चोरीस (Gold Stolen) गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संबधित महिला सोनकिरे (ता. कडेगाव) येथील आहे. त्यांचा मुलगा महेश आनंदराव पाटील यांनी पोलिसांत फिर्यादी दिली आहे. (Covid-19 Women Gold Stolen Karad Hospital Theft Case Satara Crime News)

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कडेगाव तालुक्यातील सोनकिरे येथील इंदुताई पाटील कोरोनाबाधित असून त्यांना ब्रेन स्ट्रोकही बसल्याने कऱ्हाडातील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी 18 मे पासून दाखल केले आहे. त्यांचा मुलगा महेश पाटील यांनी त्यांना येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यावेळी इंदूताई पाटील यांच्या गळ्यात सव्वा दोन तोळ्याचे सोन्याचे मणी मंगळसूत्र होते. डॉक्टरांनी सहा दिवस उपचारासाठी रुग्णाला येथे थांबावे लागेल, असे सांगितले.

हेही वाचा: पवार साहेबांचं साताऱ्यावर विशेष प्रेम; पण परिस्थिती काय, तुम्ही करताय काय?; अजित पवारांनी फटकारलं

त्यानुसार 18 ते 24 मे दरम्यान त्या येथील हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत होत्या. 24 मे रोजी रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आले. त्यावेळी डिस्चार्ज मिळताना इंदूताई पाटील यांच्या गळ्यात सव्वा दोन तोळ्याचे सोन्याचे मणी मंगळसूत्र नसल्याचे महेश यांच्या लक्षात आले. त्याबाबत सर्वत्र शोध घेतला, मात्र काहीच पत्ता न लागल्याने त्यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली.

Covid-19 Women Gold Stolen Karad Hospital Theft Case Satara Crime News

loading image