कोविड सेंटर उभारणीत खासदार रणजितसिंहांचे प्रामाणिक प्रयत्न; चंद्रकांत पाटलांकडून कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil

कोविड सेंटर उभारणीत खासदार रणजितसिंहांचे प्रामाणिक प्रयत्न; चंद्रकांत पाटलांकडून कौतुक

फलटण शहर (सातारा) : राज्यात (Coronavirus) कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड व ऑक्‍सिजनची कमतरता, तर दुसऱ्या बाजूस खासगी हॉस्पिटलमध्ये भरमसाट बिल या स्थितीमध्ये मतदारसंघातील जनतेसाठी मोफत व सुसज्ज कोविड केअर सेंटर (Covid Care Center) उभारण्याची जी संवेदनशीलता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) यांनी दाखविली आहे. ती निश्‍चितपणे अभिनंदनीय आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. (Covid Care Center Started By Chandrakant Patil At Phaltan Satara News)

येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू केलेल्या लोकनेते हिंदूराव नाईक-निंबाळकर कोविड केअर सेंटरचा प्रारंभ श्री. पाटील यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हा परिषद सदस्या अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर, विश्वासराव भोसले, प्रशांत कोरेगावकर, बजरंग गावडे आदींसह शासकीय व वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी धरण व रेल्वे प्रकल्पासाठी मोठा संघर्ष उभारला होता. एक संघर्षशील नेता अशी त्यांची प्रतिमा होती, असे सांगून पाटील म्हणाले, "खासदार निंबाळकर यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या प्रत्येक राहिलेल्या अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांसाठी सुसज्ज, सर्व सुविधांयुक्त व रुग्णांना पाणी, चहा नाष्टा, जेवण हे सर्व मोफत उपलब्ध करून देत निंबाळकर यांनी जनसेवेचा वसा खऱ्या अर्थाने जपला आहे.''

रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, म्हणून हे कोविड केअर सेंटर सर्वांच्या सहकार्याने सुरू केले आहे. माढा मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायतीला सॅनिटायझर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही दिलेली आहेत. आता येणाऱ्या रमजान ईद या सणानिमित्त मतदारसंघातील प्रमुख शहरांमध्ये दुधाचे वाटप करणार आहोत, असे खासदार निंबाळकर यांनी सांगितले. जयकुमार शिंदे यांनी प्रास्ताविक केले. अमोल सस्ते यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक अशोकराव जाधव यांनी आभार मानले. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ऑनलाइन प्रारंभ झाल्यानंतर प्रत्यक्षात आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. परिचारिका दिनानिमित्त सर्व परिचारिकांचा ऍड. जिजामाला निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कामाशिवाय संसाराचा गाडाच चालत नाही; साताऱ्यात 20 हजार महिला मदतीपासून 'वंचित'

Covid Care Center Started By Chandrakant Patil At Phaltan Satara News

Web Title: Covid Care Center Started By Chandrakant Patil At Phaltan Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..