ढेबेवाडीचे 36 खाटांचे कोविड हॉस्पिटल पहिल्याच दिवशी गॅसवर!

ढेबेवाडीचे 36 खाटांचे कोविड हॉस्पिटल पहिल्याच दिवशी गॅसवर!
Updated on

ढेबेवाडी (जि. सातारा) : पाटण तालुक्‍यातील जनतेला दिलासा देण्यासाठी येथे उभारलेले कोविड हॉस्पिटल अखेर बुधवारपासून सुरू झाले. 36 खाटांचे हे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी सुमारे दीडशे ऑक्‍सिजन सिलिंडरचा साठा आवश्‍यक असताना बुधवारी केवळ 25 सिलिंडरच तेथे उपलब्ध होते. रात्रीपर्यंत त्यातीलही सात रिकामे झाले होते. सध्या तीन रुग्ण या रुग्णालयात उपचार घेत आहेत. सायंकाळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी रुग्णालयास भेट देऊन पुरेसा सिलिंडर पुरवठा होण्याच्या दृष्टीने चर्चा करून काही नियोजनही केले.
 
तालुक्‍यात कोरोनाबाधितांचा दिवसागणिक वाढणारा आकडा आणि अन्य ठिकाणच्या कोविड हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसल्याने येणाऱ्या अडचणी या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नाने ढेबेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात 36 ऑक्‍सिजन बेडसह कोविड हॉस्पिटल उभारले आहे. रविवारपर्यंत (ता. 6) ते सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अवघ्या तीन दिवसांत यंत्रणेची जोडणीही पूर्ण करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात हॉस्पिटल सुरू होण्यास बुधवार उजाडला. पुरेसा सिलिंडर साठा नसताना बुधवारी हे हॉस्पिटल सुरू झाले.

सायंकाळपर्यंत तीन रुग्ण भरती झाले. 36 खाटांचे हे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी सुमारे दिडशे ऑक्‍सिजन सिलिंडरचा साठा आवश्‍यक असताना बुधवारी केवळ 25 सिलिंडरच तेथे उपलब्ध होते. रात्रीपर्यंत त्यातील दोन गळतीमुळे, तर तीन सिलिंडर रुग्णांसाठी वापरून रिकामे झाल्याचे सांगण्यात आले. ऑक्‍सिजनचा पुरेसा साठा या रुग्णालयाकडे उपलब्ध नसल्याने ऐनवेळी अडचणी वाढण्याचीही भीती आहे. सायंकाळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी रुग्णालयास भेट देऊन त्याबाबत माहिती घेऊन नियोजन केले. 

तहसीलदार समीर यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाराम जगताप, मंडल अधिकारी प्रवीण शिंदे आदी उपस्थित होते. रुग्णालयास सुमारे सव्वाशे कर्मचारी आवश्‍यक आहेत. आज त्यापैकी तिघेच दाखल झाल्याची माहिती मिळाली. ठराविक मर्यादेपर्यंत ऑक्‍सिजन पातळी खाली घसरलेल्या आणि श्‍वास घेण्यास त्रास होणाऱ्या बाधितांना तपासणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने येथे दाखल करण्यात येणार आहे. 

पहिल्यांदा पुरेसा ऑक्‍सिजन साठा रुग्णालयात उपलब्ध होण्यासाठी नियोजन करा. तालुक्‍यातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या जीवाशी खेळू नका. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रश्नी लक्ष घालावे, अशी विनंती आहे. 
-अमोल पाटील, सरपंच मंद्रुळकोळे 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com